ऑनलाईन ऑर्डरचा पत्ता बदलविणे महागात पडले; गुगल-पे वरून ५ रु. टाकताच पावणेदोन लाख उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 06:02 PM2022-07-09T18:02:06+5:302022-07-09T18:13:47+5:30

Online payment fraud : गुगल पेवरून ५ रुपये सेंड केले. त्यांच्या तीन बॅंक खात्यांतून १ लाख ८५ हजार ठगांनी दुसऱ्याच मिनिटाला काढून घेतले.

man loses 1.75 lakh during transactions of 5 rupees on google pay while changing the address of an online order through | ऑनलाईन ऑर्डरचा पत्ता बदलविणे महागात पडले; गुगल-पे वरून ५ रु. टाकताच पावणेदोन लाख उडाले

ऑनलाईन ऑर्डरचा पत्ता बदलविणे महागात पडले; गुगल-पे वरून ५ रु. टाकताच पावणेदोन लाख उडाले

Next
ठळक मुद्देकिराणा व्यावसायिकाला फटका

यवतमाळ : शहरात सातत्याने ऑनलाईन खरेदीच्या व्यवहारात बॅंक खात्यातून पैसे उडविले जात आहे. मोबाईलचा ॲक्सेस घेऊन ठगबाजांकडून पैसे काढून घेतले जातात. अशा सहा घटना घडल्या. यातून १३ लाख १६ हजार रुपयांची रोख उडविली. शनिवारी अशीच एक घटना समोर आली असून किराणा व्यावसायिकाला ऑनलाईन ऑर्डरचा पत्ता बदलविणे महागात पडले.

मयूर इसरानी रा. धामणगाव रोड यांचे स्टेट बॅंक चौक परिसरात किराणा दुकान आहे. इसरानी यांनी ऑनलाईन खरेदी केली. त्यासाठी त्याचा पत्ता बदलविण्यासाठी गुगल पेवरून कस्टमर केअरच्या सांगण्यावरून पाच रुपये पाठवले. पैसे सेंड करताच ठगाने इसरानी यांच्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊन त्यांच्या तीन बॅंकेतील खात्यातून एक लाख ८५ हजार रुपये काढून घेतले.

हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यापाऱ्याने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली. दरम्यान, मागील आठवडाभरातील ही फसवणुकीची सातवी घटना आहे. कस्टमर केअर सोबत संपर्क करून फसवणूक होत आहे. ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातूनही ठगबाज बॅंक खात्यातील रक्कम चोरत असून नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: man loses 1.75 lakh during transactions of 5 rupees on google pay while changing the address of an online order through

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.