मुळावा येथे मानस्तंभ प्रतिष्ठापणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 09:58 PM2017-12-08T21:58:21+5:302017-12-08T21:58:39+5:30

सकल जैन समाजाच्यावतीने उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे मानस्तंभ प्रतिष्ठापणा व विश्व कल्याण महायज्ञाचे आयोजन केले होते.

Mansthabha Pratishthapana at Mulava | मुळावा येथे मानस्तंभ प्रतिष्ठापणा

मुळावा येथे मानस्तंभ प्रतिष्ठापणा

Next
ठळक मुद्देविश्वकल्याण महायज्ञ : जैन समाजातर्फे विविध कार्यक्रम उत्साहात

आॅनलाईन लोकमत
मुळावा : सकल जैन समाजाच्यावतीने उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे मानस्तंभ प्रतिष्ठापणा व विश्व कल्याण महायज्ञाचे आयोजन केले होते. यानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमाचा शुक्रवारी समारोप झाला.
समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जैनमुनी विशेष सागरजी महाराज यांनी जैन धर्माच्या आदर्श संकल्पनांची माहिती दिली. ते म्हणाले, भगवान महावीरांचा धर्म भोगाचा नसून त्यागाचा आहे. विवादाचा नसून संवादाचा आहे. समाजात द्वेष पेरणाºयांचा नसून सद्भाव अंगीकारण्याचा आहे. भेदभेदा निर्माण करण्याचा नसून एकता प्रस्थापित करण्याचा आहे. धर्म म्हणजे जीवन मुक्तीचा मार्ग होय, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमा निमित्त मनोज पाटील आणि संच कोल्हापूर तसेच राष्टÑीय कलावंत राजेंद्र जैन उमरगा यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाला जैन समाजासह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात जीनाभिषकाने करण्यात आली. ध्वजारोहण, गुरुभक्ती, आनंद यात्रा, याग मंडल, विधान, नित्य पूजा, अठ्ठकुमारीका शोभायात्रा, विश्वशांती महारथ, मानस्तंभ प्रतिष्ठापणा आदी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला विदर्भ आणि मराठवाड्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Mansthabha Pratishthapana at Mulava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.