कामठवाड्यात गुंजला स्वच्छतेचा मंत्र
By Admin | Published: December 26, 2015 03:17 AM2015-12-26T03:17:46+5:302015-12-26T03:17:46+5:30
शेंडगाव ते सेवाग्राम स्वच्छता संदेश आणि शेतकरी जागर यात्रेने कामठवाड्यात भेट दिली.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : मनदेव घाटातील प्रकार
हिवरी : राज्य महामार्ग असलेल्या नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावर मनदेव घाट परिसरात वाळलेली झाडे रस्त्यावर पडून आहेत. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून अर्धवट कापलेले हे झाड रस्त्यावर पडून आहे. बांधकाम विभागाकडे सूचना देऊनही हे झाड काढण्यात आलेले नाही.
यवतमाळ ते आर्णी जणारा हा महामार्ग तसाही अपघातांच्या मालिकांसाठी परिचितच आहे. रस्त्यावर असलेल्या झाडांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे रोष निर्माण झाला आहे. किरकोळ देखभालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यानेच जीवघेणे अपघात घडतात. याला केवळ बांधकाम खात्यातील अभियंते व कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे. (वार्ताहर)