मंत्राने पेटवला होम अन् लिंबातून काढले रक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:00 AM2020-01-22T06:00:00+5:302020-01-22T06:00:06+5:30

दत्तक ग्राम पारधी तांडा बिजोरा येथे विशेष शिबिरादरम्यान आयोजित बौद्धिक सत्रात अंधश्रद्धा निर्मूलनपर वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.सुनील चकवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.शंकर सावंत, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रियंका रूईकर, प्रा.धनश्री कोठेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.मनीष मोहरील उपस्थित होते.

The mantra burns and blood from lemon | मंत्राने पेटवला होम अन् लिंबातून काढले रक्त

मंत्राने पेटवला होम अन् लिंबातून काढले रक्त

googlenewsNext
ठळक मुद्देअंधश्रद्धेवर प्रहार : रासेयो विद्यार्थ्यांनी भोंदूंची केली पोलखोल, पारधी तांडा येथे दाखविले प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : अंधश्रद्धा पसरवत नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम भोंदूंकडून केले जाते. काही ठळक क्लृप्त्या हे भोंदू बाबा वापरतात. या मागील वैज्ञानिक बाजू काय, हे दाखवत रासेयोच्या विद्यार्थ्यांनी स्वत:च मंत्राने होम पेटवून दाखवला तर लिंबातून रक्त काढून दाखविले. अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांची पोलखोल यावेळी रासेयो विद्यार्थ्यांनी केली.
येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात अंद्धश्रद्धानिर्मुलनपर वैज्ञानिक दृष्टीकोन व जादुटोणा विरोधी कायदा या विषयावरील व्याख्यानात चमत्कारांचे विविध प्रकारांचे सादरीकरण केले. तसेच त्यामागील विज्ञान, कारणमिमांसा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नीलेश मिसाळ यांनी स्पष्ट केली.
दत्तक ग्राम पारधी तांडा बिजोरा येथे विशेष शिबिरादरम्यान आयोजित बौद्धिक सत्रात अंधश्रद्धा निर्मूलनपर वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.सुनील चकवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.शंकर सावंत, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रियंका रूईकर, प्रा.धनश्री कोठेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.मनीष मोहरील उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते विज्ञानवादी संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. जयश्री शेंदूरकर या विद्याथीर्नीने स्वागतगिताने सादर केले.
निलेश मिसाळ यांनी अंधश्रद्धा म्हणजे काय? हे स्पष्ट करताना अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना आहे असे मानणे म्हणजे अंधश्रद्धा. धर्मप्रक्रियेतील चिकित्सा न करणे, प्रश्न न विचारणे व शब्दप्रामाण्य मानणे या व्यक्तीमत्व व मानवी मेंदुच्या विकासाला मारक ठरणाºया बाबी आहेत. चमत्कार करणाऱ्यांना आव्हान आहे की, त्यांनी ते करून दाखवावे, भूत-चकवा दाखवा, आमच्या कार्यकर्त्यांवर करणी करून दाखवा, मंत्राने साधा भाजला पापड मोडून दाखवा, हवेत हात फिरवून एखादे ढेकूण काढून दाखविणाºयास अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून २५ लाखांचे बक्षीस ठेवले असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व सर्व संतांनी कोणत्याही चमत्कारांचे कधीही समर्थन केले नाही. याउलट वाईट चालीरीती, अंधश्रद्धा यांवर कडाडून हल्ला केला. संत गाडगेबाबा हे वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे संत होते. संचालन अंजली कोटकर हिने तर आभार प्रदर्शन जयश्री शेंदुरकार हिने मानले. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.विलास राऊत व संस्थेच्या सचिव संगीता घुईखेडकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.शंकर सावंत, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रियंका रूईकर, प्रा.अख्तर रून्नीसा कुरेशी, प्रा.धनश्री कोठेकर, डॉ.मनीष मोहरील व रासेयो स्वयंसेवकानी परिश्रम घेतले.

Web Title: The mantra burns and blood from lemon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.