अन्न सुरक्षा योजनेपासून अनेक नागरिक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 09:37 PM2018-12-24T21:37:59+5:302018-12-24T21:38:19+5:30

तालुक्यातील अनेक नागरिक अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित आहे. त्यांना धान्य मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

Many civic people are deprived of food security scheme | अन्न सुरक्षा योजनेपासून अनेक नागरिक वंचित

अन्न सुरक्षा योजनेपासून अनेक नागरिक वंचित

Next
ठळक मुद्देउमरखेड तालुका : सलग तीन वर्षांपासून पाठपुरावा, तरीही अपयश

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील अनेक नागरिक अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित आहे. त्यांना धान्य मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
शासनाने अन्न सुरक्षा योजना सुरू करून धान्य पुरविण्याची ग्वाही दिली. शिधापत्रिकेवर त्यांना धान्य देण्याची हमी दिली. प्रत्यक्षात अनेक शिधापत्रिकाधारकांचा अद्याप या योजनेत समावेशच झाला नाही. परिणामी त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अनेक केशरी शिधापत्रिकाधारक या योजनेपासून वंचित आहे. त्यांचा अन्नसुरक्षा योजनेत समाविेश झाला नाही. परिणामी त्यांना रास्त भाव दुकानदार धान्य देण्यास तयार नाही.
तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील बोरी (वन) येथील अनेक नागरिक अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून योजनेम समावेश करावा म्हणून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांची नावे अद्याप समाविष्ट झाली नाही. परिणामी आदिवासी भूमिहिन, शेतमजूर व दिव्यांगासह अनेक नागरिक गेल्या तीन वर्षांपासून धान्यापासून वंचित आहे.
या वंचित नागरिकांनी पंचायत समिती सदस्य धनराज तगरे यांच्या नेतृत्वात तहसीलवर धडक दिली. त्यात आदिवासी, भूमिहिन, दिव्यांग, मागासवर्गीय, मजुरांचा समावेश होता. त्यांनी २०१४ पासून केशरी शिधापत्रिका काढल्या. मात्र संबंधित दुकानदारांकडून धान्यच मिळाले नाही, असा टाहो तहसीलदार भगवान कांबळे यांच्यासमोर फोडला.
अन्यथा उपोषण करणार
गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही अनेक नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. पात्र असूनही त्यांना धान्य मिळत नाही. त्यामुळे आता वंचित नागरिकांनी न्याय न मिळाल्यास येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Many civic people are deprived of food security scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.