मनसेने जाळला विदर्भाचा नकाशा
By Admin | Published: September 18, 2016 01:36 AM2016-09-18T01:36:01+5:302016-09-18T01:36:01+5:30
मनसेच्या कार्यकर्त्यांनी विदर्भवादी नेत्यांवर हल्लाबोल करीत विदर्भ राज्य जनआंदोलन समितीचा झेंडा जळला. शनिवारी विदर्भवाद्यांच्या विरोधात नारेबाजी केली.
विदर्भवाद्यांवर रोष : अखंड महाराष्ट्रासाठी नारेबाजी
यवतमाळ : मनसेच्या कार्यकर्त्यांनी विदर्भवादी नेत्यांवर हल्लाबोल करीत विदर्भ राज्य जनआंदोलन समितीचा झेंडा जळला. शनिवारी विदर्भवाद्यांच्या विरोधात नारेबाजी केली.
काही दिवसांपूर्वी मुंबईत विदर्भवाद्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र विदर्भाची मागणी केली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी विदर्भवादी नेत्यांना धक्काबुक्की केली होती. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आला. शनिवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेताजी चौकात विदर्भवाद्यांच्या विरोधात नारेबाजी केली. वेगळ्या विदर्भाचा नकाशा जाळला. अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मनसेचे पदाधिकारी विकास पवार, संजय देठे, गोपाल घोडमारे, अमित बदनोरे, नंदू घुगे, संगीता घोडमारे, दीपक आडे, फारूक तमन्ना, विलास बट्टावार, मयूर जुमळे, छबू आठवले उपस्थित होते. (शहर वार्ताहर)