मराठा, धनगर, मुस्लीम रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 09:47 PM2018-08-09T21:47:01+5:302018-08-09T21:47:40+5:30
आरक्षणासह विविध मागण्यांकरीता मराठा-कुणबी, मुस्लिम, व धनगर समाजाच्या वतीने दारव्हा बंद पुकारण्यात आला होता. या संयुक्त आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : आरक्षणासह विविध मागण्यांकरीता मराठा-कुणबी, मुस्लिम, व धनगर समाजाच्या वतीने दारव्हा बंद पुकारण्यात आला होता. या संयुक्त आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केले.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता गुरुवारला बंद व मोचार्चे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम व धनगर समाजाची सुध्दा हिच मागणी असल्याने त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शहर बंदच्या संयुक्त आवाहनाला स्वयंस्फूतीर्ने प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ शाळा ,महाविद्यालये वाहतूक बंद होती.
समाजबांधव सकाळीच गोळीबार चौकात जमा झाले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणाबाजीने शहर दुमदुमले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर सर्व समाजातील मुलींच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर गोळीबार चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व समाजातील प्रतिनिधींनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले.
या आंदोलनात मराठा-कुणबी, मुस्लिम, धनगर यासह इतरही समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रीता उईके व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त लावला होता.