मराठा आंदोलन पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 10:28 PM2018-07-25T22:28:15+5:302018-07-25T22:29:09+5:30

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारी उमरखेड विभागातही उमटले. सकल मराठा समाजाच्या या आरक्षणाला अचानक हिंसक वळण मिळाल्याने एसटी बसची तोडफोड व पोलिसांवर दगडफेकीच्या घटना घडल्या.

The Maratha movement was launched | मराठा आंदोलन पेटले

मराठा आंदोलन पेटले

Next
ठळक मुद्देउमरखेडमध्ये हिंसक वळण : एसटी फोडली, पोलिसांवर दगडफेक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारी उमरखेड विभागातही उमटले. सकल मराठा समाजाच्या या आरक्षणाला अचानक हिंसक वळण मिळाल्याने एसटी बसची तोडफोड व पोलिसांवर दगडफेकीच्या घटना घडल्या.
जिल्ह्यात उमरखेडमध्येच मराठा आंदोलनाची धग पहायला मिळाली. काही प्रमाणात पुसद, दिग्रस या भागात आंदोलक रस्त्यावर उतरले. उमरखेडमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन युती सरकारचा निषेध नोंदविला. बाजारपेठ आधीच बंद ठेवण्यात आली होती. आंदोलक संजय गांधी चौकात (गायत्री चौक) आले असता अचानक त्याला जणू गालबोट लागले. यावेळी कुणी तरी दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत दराटीचे ठाणेदार सुभाष उन्हाळे व दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. शिवाय आंदोलकांपैकी दोघांनासुद्धा दगडफेकीत जखमी व्हावे लागले. यावेळी बंदोबस्ताला असलेले उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार हनमंत गायकवाडहेसुद्धा दगडफेकीत सापडले. परंतु डोक्यावर हेल्मेट असल्याने ते जखमी झाले नाही. विडूळ येथेही अज्ञात आंदोलकांनी मार्गपरिवहन महामंडळाच्या दोन बसेसच्या काचा फोडल्या. त्यात तीन प्रवाशांना जखमी व्हावे लागले. हे आंदोलन सुरू असतानाच वकीलांनी कोट जाळून सरकारचा निषेध नोंदविला. आंदोलन हाताबाहेर जात असल्याचे पाहून पुसद, लाडखेड, वणी, दराटी, यवतमाळ पोलीस मुख्यालय येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलविण्यात आली. आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी उमरखेडला भेट दिली. जाधव अजूनही येथेच तळ ठोकून आहे. दिग्रस शहरामध्ये दिवसभर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तेथे ठिय्या आंदोलन केले. पुसद, यवतमाळसह इतरत्र मात्र शांतता होती.
पोलीस शिपायाला ठाण्यातच हृदयाघात
उमरखेड शहरात रस्त्यावर मराठा समाजाचे आंदोलन पेटलेले असतानाच पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीवर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला अचानक हृदयाघात झाला. त्यांना तातडीने नांदेड येथे उपचारार्थ हलविण्यात आले.
 

Web Title: The Maratha movement was launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.