मारेगाव शहरात होतेय महिलांची कुचंबणा

By admin | Published: May 28, 2016 02:26 AM2016-05-28T02:26:48+5:302016-05-28T02:26:48+5:30

येथील बसस्थानक चौक व मार्डी चौकातील प्रवासी निवारा परिसरात महिलांसाठी एकही प्रसाधनगृह नाही.

Maregaon City Women's Kunchambana | मारेगाव शहरात होतेय महिलांची कुचंबणा

मारेगाव शहरात होतेय महिलांची कुचंबणा

Next

प्रशासनाचे दुर्लक्ष : बसस्थानकही उपेक्षित
मारेगाव : येथील बसस्थानक चौक व मार्डी चौकातील प्रवासी निवारा परिसरात महिलांसाठी एकही प्रसाधनगृह नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे. याकडे मात्र प्रशासनाला लक्ष द्यायला वेळच नसल्याचे दिसून येते.
मारेगाव शहराला आता नुकताच नगरपंचायतीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र तरीही शहराचा विकास अद्याप पाहिजे तसा झालाच नाही. या लहानशा शहरात महिलांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृह नाही़ त्यामुळे शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसह महिला प्रवासी आणि कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महिलांसाठी शहरात कुठेही प्रसाधन गृह उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी कुचंबणा होते. लघुशंकेसाठी कुठे जावे, असा प्रश्न त्यांना पडतो. वणी-यवतमाळ मार्गावर बस थांबा आहे़ या थांब्याजवळ दिवस-रात्र प्रवाशांची वर्दळ असते. त्यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असतो. मात्र बस थांब्यानजिक त्यांच्यासाठी प्रसाधन गृहाची सुविधाच नाही. परिणामी बसची वाट बघणाऱ्या महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो. हीच परिस्थिती शहरातील मार्डी थांब्यावरही आहे. तेथे प्रवासी निवाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु त्यात महिलांसाठी प्रसाधन गृहाची व्यवस्थाच करण्यात आली नाही. त्यामुळे या थांब्यानजिक गावाकडे जाण्यासाठी बसची वाट बघणाऱ्या महिलांची कुचंबणा होते. शहरातील विविध बँक, तहसील, पंचायत समिती, कृषी विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, ग्रामीण रूग्णालय, पोलीस ठाणे आदी ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह नाही. या कार्यालयात दररोज ये-जा करणाऱ्या महिलांनाही असुविधांचा सामना करावा लागतो. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Maregaon City Women's Kunchambana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.