मारेगाव तालुका ओल्या दुष्काळाच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:48 AM2021-09-12T04:48:27+5:302021-09-12T04:48:27+5:30
तालुक्याला पांढरे सोने पिकविणारा तालुका म्हणून ओळख आहे. मागीलवर्षी बोंडअळीने शेतकरी मेटाकुटीस आला, तर या वर्षी तरी कापूस साथ ...
तालुक्याला पांढरे सोने पिकविणारा तालुका म्हणून ओळख आहे. मागीलवर्षी बोंडअळीने शेतकरी मेटाकुटीस आला, तर या वर्षी तरी कापूस साथ देईल, या आशेने कापसाची पेरणी केली आहे. मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसाने सोयाबीनचे पीक हातचे गेले. याहीवर्षी अतिवृष्टी होत असून, पावसाने टक्केवारी ओलांडली आहे. परिणामी, कापूस व सोयाबीन पिके पिवळी पडू लागली आहेत. पिवळसर पाती गळणे सुरू आहे, तर सोयाबीन जोमात असून, सततच्या पावसाने हे पीक खराब होण्याची शक्यता आहे. सोयाबीन पिकाची पाने गळायला लागली आहेत. ओलावा अधिक असल्याने जमिनी चिभडल्या आहेत. कापसाची बोंडे सडत असून, शेतकरी मात्र चांगलाच धास्तावला आहे. शासनाने अतिवृष्टीचा सर्व्हे करून मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.