बारावी परीक्षेच्या निकालात मारेगाव तालुका माघारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:00 AM2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:00:09+5:30

बारावीच्या परीक्षेमध्ये मागीलवर्षी तोंडी परीक्षेचे गुण काढून टाकल्याने निकाल धक्कादायकरित्या खाली आला होता. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने त्याचा फेरविचार करून यावर्षी पुन्हा तोंडी परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच ऐन परीक्षेच्या काळात देशावर कोरोनाचे संकट आल्याने प्रशासनाचे लक्ष विचलीत झाले. याचाच परिणाम होऊन यावर्षी निकाल विस्मयकारकरित्या वाढला आहे.

Maregaon taluka withdrew in the result of 12th examination | बारावी परीक्षेच्या निकालात मारेगाव तालुका माघारला

बारावी परीक्षेच्या निकालात मारेगाव तालुका माघारला

googlenewsNext
ठळक मुद्देनिकालाने रेकॉर्ड मोडले : वणी ८२.०१, मारेगाव ७९.६६, झरी ९२.०३, पांढरकवडा तालुक्याचा निकाल ९३.९०

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर झाला़ यावर्षी तोंडी परीक्षेचे गुण पुन्हा बहाल केल्याने निकालावर पुन्हा सूज आल्याचे दिसून येत आहे. जवळपास बहुतांश शाळांचा निकाल ८० टक्केपेक्षा अधिक लागला आहे. वणी उपविभागातून मारेगाव तालुक्याचा निकाल सर्वात कमी लागला आहे, तर पांढरकवडा तालुक्याने झरी उपविभागात बाजी मारली आहे.
बारावीच्या परीक्षेमध्ये मागीलवर्षी तोंडी परीक्षेचे गुण काढून टाकल्याने निकाल धक्कादायकरित्या खाली आला होता. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने त्याचा फेरविचार करून यावर्षी पुन्हा तोंडी परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच ऐन परीक्षेच्या काळात देशावर कोरोनाचे संकट आल्याने प्रशासनाचे लक्ष विचलीत झाले. याचाच परिणाम होऊन यावर्षी निकाल विस्मयकारकरित्या वाढला आहे. सर्वच तालुक्यांचा निकाल मागील वर्षीपेक्षा वाढला आहे. १०० टक्के निकाल देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये वाढ झाली आहे. अनेक विज्ञान शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे सर्वच पेपर संपल्यानंतर राज्यात लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे पेपर तपासणीसाठी अडथळे निर्माण झाले होते. परिणामी निकाल दोन महिने उशिरा लागला. वणी तालुक्याचा बारावीचा निकाल ८२.०१ टक्के लागला. तालुक्यातून दोन हजार ३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी एक हजार ६६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात वणी तालुक्यातून प्रथम येण्याचा मान वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाची सुवर्णा किसनराव हनुमंते हिने मिळविला असून तिला ९०.४६ टक्के गुण मिळाले आहेत.
मारेगाव तालुक्याचा बारावीचा निकाल ७९.६६ टक्के लागला आहे़ तालुक्यातून ९४४ विद्यार्थी बसले. त्यांपैकी ७५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्यातून मारेगाव येथील कला-वाणिज्य महाविद्यालयातील वैशाली संजय सिडाम ही विद्यार्थीनी तालुक्यातून प्रथम आली. तिला ८४.१५ टक्के गुण मिळाले आहेत. झरीजामणी तालुक्याचा बारावीचा निकाल ९२.०३ टक्के लागला आहे़ ६५३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यांपैकी ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुकूटबन येथील मातोश्री पुनकाबाई विजाभज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील राज अनिल पारखी हा झरी तालुक्यातून प्रथम आला असून त्याने ८५.०७ टक्के गुण मिळविले. पांढरकवडा तालुक्याचा निकाल ९३.९० टक्के लागला़ एक हजार ७०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यांपैकी एक हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या तालुक्यातून जिल्हा परिषद माजी शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाचा तुषार शरद काळे हा ८६ टक्के गुण घेऊन प्रथम आला.

१० शाळांचा निकाल लागला १०० टक्के
उपविभागातील १० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये वणीतील हाजी शिराजुद्दीन कॉलेज राजूर व लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल वणी, झरीमधून शासकीय ज्युनिअर कॉलेज शिबला, राजीव कनिष्ठ महाविद्यालय पाटण, पांढरकवडामधून सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय वाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्युनिअर कॉलेज भाडउमरी व जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय पांढरकवडाची विज्ञान शाखा, मारेगावातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय बोटोणी विज्ञान शाखा व जीवन विकास विद्यालय मारेगाव, या महाविद्यालयांचा समावेश आहे.

प्रथम वर्षाच्या प्रवेशाची समस्या भेडसावणार
यावर्षी बारावीचा विज्ञान, कला व वाणिज्य तिनही शाखांचा निकाल रेकॉर्डब्रेक लागल्याने चारही तालुक्यात प्रथम वर्षाच्या उपलब्ध जागा व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, प्रथम वर्षाच्या प्रवेशाची समस्या भेडसावणार असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे अधिक कल असतो. परंतु बीएससी प्रथम वर्षाचे चारही तालुक्यात मोजकेच वर्ग असल्याने अनेक विद्यार्थ्यांना बीएससीला प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता लागली आहे. हीच परिस्थिती कला व वाणिज्य शाखेमध्येही होणार आहे. शासनाला प्रथम वर्षाच्या अधिक जागा निर्माण करून द्याव्या लागणार आहेत.

Web Title: Maregaon taluka withdrew in the result of 12th examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.