मारेगावात अडीच कोटींची कामे निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:00 AM2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:00:12+5:30

कामे बोगस करून तर काही ठिकाणी कामे न करताच नगरपंचायत व बांधकाम विभागाने संगनमत करून हा पैसा हडप केला. यासंदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतर यवतमाळचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, अभियंता पी.एम.बुब यांनी कामाची पाहणी करून कामे बोगस असल्याला दुजोरा दिला. तसेच दोषींवर कार्यवाही करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते.

In Maregaon, works worth Rs | मारेगावात अडीच कोटींची कामे निकृष्ट

मारेगावात अडीच कोटींची कामे निकृष्ट

Next
ठळक मुद्देशहरातील रस्ते व नालींची बांधकामे: जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिकांची पुन्हा तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : शहरातील रस्ते व नाली बांधकामासाठी आलेल्या दोन कोटी ४८ लाख रूपयांची कामे इस्टिमेटप्रमाणे न करता निकृष्ट करून वाढीव कामाच्या नावावर लाखो रूपये उचलल्याचा प्रकार घडला आहे. ही कामे पुन्हा नव्याने करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शहरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
मारेगाव शहरात नगरपंचायतीअंतर्गत शहर विकास निधीतून बांधकाम विभागामार्फत दोन कोटी ४८ लाख रूपयांची कामे गेल्या दोन वर्षांपासून शहरात करण्यात आली. मात्र ही कामे बोगस होत असल्याच्या तक्रारी जनतेतून होत होत्या. अनेकदा वर्तमानपत्रातही वृत प्रकाशित झाले. परंतु बोगस कामे शहरात सर्रास सुरू होती.
कामे बोगस करून तर काही ठिकाणी कामे न करताच नगरपंचायत व बांधकाम विभागाने संगनमत करून हा पैसा हडप केला. यासंदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतर यवतमाळचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, अभियंता पी.एम.बुब यांनी कामाची पाहणी करून कामे बोगस असल्याला दुजोरा दिला. तसेच दोषींवर कार्यवाही करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही आश्वासन पाळले गेले नाही, असा आरोप नागरिकांनी निवेदनातून केला आहे.
कोट्यवधी रूपये खर्च करून शहरात बांधलेल्या विकास कामांची सहा महिन्यांत वाट लागली असून त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही कामे मंजूर इस्टिमेटप्रमाणे करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे केली आहे.

आमदारांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा
शहरातील बोगस कामांची चौकशी करून संबंधीत कंत्राटदाराविरूद्ध कार्यवाही व इस्टिमेटप्रमाणे नव्याने कामे करून न दिल्यास आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला कुलूप ठोकून आमरण उपोषणाला बसू, असा इशारा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी चार महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र मोठा कालावधी उलटूनही समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याचे वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यासंदर्भात आपण जिल्हाधिकाºयांकडे नव्याने तक्रार करणार असून लवकरच आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याची माहिती आ.बोदकुरवार यांनी दिली.

Web Title: In Maregaon, works worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.