दिवाळीच्या बाजारात गर्दी, तरी खरेदी आटोपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 09:41 PM2018-11-04T21:41:38+5:302018-11-04T21:41:59+5:30

दिवाळीचा शेवटचा बाजार खरेदी करण्यासाठी गावखेड्यातील नागरिकांनी रविवारी यवतमाळात हजेरी लावली. यामुळे शहरात एकच गर्दी उसळल्याचे चित्र होते. मात्र ही गर्दी किराणा दुकान आणि कापड दुकानापुरतीच सीमित राहिली.

In the market in the Diwali market, however, the purchase price | दिवाळीच्या बाजारात गर्दी, तरी खरेदी आटोपती

दिवाळीच्या बाजारात गर्दी, तरी खरेदी आटोपती

Next
ठळक मुद्देग्रामीण ग्राहकांची यवतमाळात धाव : रांगोळी, मूर्ती, प्रसाद खरेदीवरच समाधान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिवाळीचा शेवटचा बाजार खरेदी करण्यासाठी गावखेड्यातील नागरिकांनी रविवारी यवतमाळात हजेरी लावली. यामुळे शहरात एकच गर्दी उसळल्याचे चित्र होते. मात्र ही गर्दी किराणा दुकान आणि कापड दुकानापुरतीच सीमित राहिली.
दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी दु:ख बाजूला सारीत दिवाळी साजरी करण्यासाठी बाजारात पाय ठेवला. किराणा दुकानात सर्वाधिक गर्दी होती. बाजारहाट करणारे नागरिक आपल्या चिल्या-पिल्यांना कपडे घेता यावे म्हणून विशेष तयारीने शहरात दाखल झाले होते. कपड्याचे भाव परवडणारे नाही. यामुळे कमी किमतीच्या कापडांच्या खरेदीवरच समाधान मानत खरेदी आटोपती घेतली. रांगोळी, उटणे, मूर्ती, गोधनाचे साहित्य, फोटो, प्रसाद आणि फडे खरेदी करण्यासाठी गर्दी होती.
दिवाळीत एसटी महामंडळाला प्रवाशांची वाढलेली गर्दी वाहून नेणे अवघड झाले आहे. यामुळे खासगी वाहन हाऊसफुल्ल असल्याचे चित्र होते.
धनत्रयोदशीच्या पर्वावरही सोन्याचे बुकिंग नाही
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी केली जाते. डॉलरच्या तुलनेत रूपया घसरत आहे. यामुळे सोन्याच्या किमती दररोज कमी जास्त होत आहे. याचा परिणामा सराफा बाजारावर पाहायला मिळाला. दरवर्षी धनत्रयोदशीपूर्वी अ‍ॅडव्हान्स बुकिंग केले जाते. यावर्षी असे बुकींगच आले नाही. जी गर्दी बाजारात आहे, ती थोडीथोडकी आहे.
भारनियमनाने रोषणाई खरेदी प्रभावित
रोषणाई करणारी लायटिंग आणि विविध रंगाचे आकाशदिवे असणारे दुकान बाजारात आहेत. या दुकानावर कमी अधिक प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. भारनियमनाने या वस्तूंच्या खरेदीमध्ये मंदी असल्याचे दृश्य रविवारी पाहायल मिळाले.

शुभेच्छापत्रांची दुकाने ओस
शुभेच्छापत्रांची जागा स्मार्ट फोनने घेतली. यामुळे शुभेच्छापत्र खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच राहिली. यातून शुभेच्छापत्रांच्या दुकानात शुकशुकाट होता.

Web Title: In the market in the Diwali market, however, the purchase price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी