हजार वऱ्हाडी रफादफा, दहा लोकांमध्येच शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:26+5:30

हा नवरदेव होता यवतमाळचा. तर नवरी होती किन्हाळाची. कोरोनामुळे सर्वत्र गर्दी टाळली जात असताना किन्हाळा गावात मात्र हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची तयारी झाली होती. त्यासाठी यवतमाळातील तीन-चार वाहनांमध्ये वºहाडी रवाना झाले. ही माहिती गावातील आशा सेविकेला कळताच तिने मेटीखेडाचे आरोग्य पर्यवेक्षक मनोज पवार यांना दिली.

Marriage ceremony in presence of ten guests | हजार वऱ्हाडी रफादफा, दहा लोकांमध्येच शुभमंगल

हजार वऱ्हाडी रफादफा, दहा लोकांमध्येच शुभमंगल

Next
ठळक मुद्देऐनवेळी परतविली गर्दी : कोरोनाच्या धास्तीने जागरुक कार्यकर्त्यांनी टाळला कळंब तालुक्यातील पेचप्रसंग

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हिरवा मांडव पडला. त्या पलिकडे मोठा शामियानाही सजला. नवरी नटून तयार होती. नवरदेव चार ट्रॅक्स आणि एक मोठे वाहन भरुन लग्नवऱ्हाडी घेऊन पोहोचला. किमान ११०० ते १२०० जणांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार होता. मात्र ऐनवेळी धडकलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोनाविषयी जनजागृती करून सर्वांचे मन वळविले आणि वऱ्हाड्यांना आपआपल्या गावाकडे परत पाठविले. केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.
हा नवरदेव होता यवतमाळचा. तर नवरी होती किन्हाळाची. कोरोनामुळे सर्वत्र गर्दी टाळली जात असताना किन्हाळा गावात मात्र हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची तयारी झाली होती. त्यासाठी यवतमाळातील तीन-चार वाहनांमध्ये वऱ्हाडी रवाना झाले. ही माहिती गावातील आशा सेविकेला कळताच तिने मेटीखेडाचे आरोग्य पर्यवेक्षक मनोज पवार यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पवार यांनी संकल्प फाऊंडेशनचे यवतमाळातील पूर्वज गलांडे, आकाश भारती, तुषार गिरी व काही कार्यकर्ते सोबत घेतले आणि तडक किन्हाळा (ता.कळंब) गाव गाठले. गावाबाहेरच वऱ्हाड्यांना रोखून सर्वांना कोरोना जनजागृतीबाबत पॉम्पलेट वाटप केले. डीजे परत पाठविण्यात आला. यावेळी अनेकांनी विरोधही केला. मात्र पवार यांनी गावातील सरपंच सुदाम पवार यांच्याशी चर्चा करून सर्व वऱ्हाड्यांचे मन वळविण्यात यश मिळविले. अखेर सर्वांनी समंजसपणा दाखवित लग्नातील गर्दी टाळली. केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत वधू-वरांचे शुभमंगल पार पाडण्यात आले.
सध्या दिल्लीत झालेल्या मरकस कार्यक्रमातील हजारोंची उपस्थिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाजत आहे. किन्हाळात हजार-बाराशे मंडळींच्या हजेरीत हा लग्न सोहळा झाला असता तर जिल्ह्यात मरकस सारखीच परिस्थिती निर्माण होण्याचा धोका होता.

आशा सेविकेचे प्रसंगावधान ठरले उपयुक्त
अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या गावखेड्यातील आशा सेविका कोरोनाच्या प्रादूर्भावात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. किन्हाळात होऊ घातलेल्या लग्नातील गर्दीचा धोकाही सर्वप्रथम आशा सेविकेने ओळखला. मात्र प्रसंगावधान राखून तिने आपल्या वरिष्ठांना माहिती कळवून ही गर्दी रोखली. अन्यथा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव आणखी वाढला असता. विशेष म्हणजे हजार वºहाडी गावातून परत पाठविताना प्रत्येकाला कोरोनाची माहिती देणारे पॉम्पलेट देण्यात आले. प्रत्येकाचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात आले.

Web Title: Marriage ceremony in presence of ten guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न