मास्क विक्रीची गाडी जप्त करताच 'त्याने' वाहनापुढे घातले लोटांगण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:15 PM2021-05-27T20:15:30+5:302021-05-27T20:18:12+5:30

Yavatmal News : वणी शहरातील दादाजी पोटे हे लॉकडाऊन काळात दीपक चौपाटी परिसरात मास्क विक्रीचा व्यवसाय करीत होते.

Mask sales vehicle confiscated in yavatmal | मास्क विक्रीची गाडी जप्त करताच 'त्याने' वाहनापुढे घातले लोटांगण

मास्क विक्रीची गाडी जप्त करताच 'त्याने' वाहनापुढे घातले लोटांगण

Next

वणी (यवतमाळ) - दीपक टॉकीज चौकात नगरपालिकेच्या पथकाने मास्क विक्रीचा ठेला जप्त केला. त्यामुळे मास्क विक्रेत्याने चक्क शासकीय वाहनापुढे लोटांगण घालत आपला संताप व्यक्त केला. ही घटना गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. वणी शहरातील दादाजी पोटे हे लॉकडाऊन काळात दीपक चौपाटी परिसरात मास्क विक्रीचा व्यवसाय करीत होते. गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नगरपरिषदेचे एक पथक त्यांच्या हातगाडीपुढे आले व पथकाने पोटे यांना हातगाडी हटविण्यास सांगितली. 

पोटे यांनी गाडी हटविली नाही. त्यामुळे पालिकेच्या पथकाने त्यांची हातगाडी मालासह जप्त करून ती गाडी तहसील कार्यालयात नेण्यात येत होती. दरम्यान, काठेड ऑईल मिलजवळ पोटे यांनी तहसीलदारांच्या गाडीपुढे लोटांगण घालत गरिबांनी जगावे कसे, असा सवाल उपस्थित केला. यावेळी पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र कापसीकर यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. अखेर पोटे यांना तेथे उपस्थित पोलिसांनी जबरीने वाहनात बसविले. मात्र काही वेळानंतर पोटे यांना त्यांची गाडी परत केली.
 

Web Title: Mask sales vehicle confiscated in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.