येरमल हेटी येथे सामूहिक विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:43 AM2018-04-09T00:43:23+5:302018-04-09T00:43:23+5:30
तालुक्यातील येरमल हेटी येथे सर्व धर्म सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तब्बल १३२ जोडपी विवाहबद्ध झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील येरमल हेटी येथे सर्व धर्म सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तब्बल १३२ जोडपी विवाहबद्ध झाली.
केळझरा येथील तुळजा भवानी ग्रामीण बहुउद्देशीय संस्था व चंद्रभानजी आडे बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळातर्फे बळीराजा चेतना अभियान व महिला बालकल्याण विभागातर्फे शिवाजीराव मोघे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा हेटी यरमल येथे सर्व धर्मीय सामूहिक विवाह मेळावा ोण्यात आला. यात १३२ नववर-वधू विवाहबद्ध झाले. हा ग्रामीण भागातील सर्वात मोठा सामूहिक विवाह मेळावा ठरला. आकाश राठोड तथा भारत राठोड यांच्या नियोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, राजू डांगे, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा विकास मंचचे भारत राठोड, माजी नगराध्यक्ष अनिल आडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, पंचायत समिती सभापती सुरेश जयस्वाल, उपसभापती पपिता भाकरे, राजू डांगे, विपीन राठोड आदी उपस्थित होते. ना.अहीर यांनी धकाधकीच्या जीवनात अशा सामूहिक विवाह मेळाव्यांची गरज असल्याचे सांगितले. नववर-वधूंच्या पालकाची जबाबदारी स्वीकारलेल्या आकाश चंदू राठोड यांचे कौतुक केले.
मुख्य संयोजक किसन राठोड, चंदू राठोड, मनीष राठोड, आर.एल. काकडे, अर्जुन जाधव, मुरलीधर जाधव, अर्जुन राठोड, मोहन कनाके, रमेश किनाके, डी.के. कडवे, संदीप चव्हाण, उमेश कुमरे, नीलेश माहुरे, प्रशांत राघोर्ते तथा शिवाजीराव मोघे आश्रमशाळेचे प्राचार्य विनोद राठोड, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.