यवतमाळ जिल्ह्यात मुकूटबन येथील भीषण आग: दोन हजार क्विंटल कापूस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:16 PM2020-06-09T12:16:38+5:302020-06-09T12:16:58+5:30

यवतमाळ जिल्ह्यात मुकूटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये ठेऊन असलेल्या सीसीआयच्या कापूस गंजीला आग लागून त्यात दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

Massive fire at Mukutban in Yavatmal district: 2,000 quintals of cotton burnt | यवतमाळ जिल्ह्यात मुकूटबन येथील भीषण आग: दोन हजार क्विंटल कापूस खाक

यवतमाळ जिल्ह्यात मुकूटबन येथील भीषण आग: दोन हजार क्विंटल कापूस खाक

Next


लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : झरी तालुक्यताील मुकूटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये ठेऊन असलेल्या सीसीआयच्या कापूस गंजीला आग लागून त्यात दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या जिनिंगमध्ये दरवर्षीच कापसाला आग लागते. त्यामुळे ही आग लागली की लावण्यात आली, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. कापसाची गंजी लावताना यंत्रातून निघालेल्या ठिणगीने ही आग लागल्याचा दावा सीसीआयचे केंद्रप्रमुख रत्नाकर पोटे यांनी लोकमतशी बोलताना केला. दरम्यान, आग आटोक्यात आली असून आग विझविण्याचे काम सकाळी ११ नंतरही सुरूच होते.

Web Title: Massive fire at Mukutban in Yavatmal district: 2,000 quintals of cotton burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग