वैद्यकीय अधिकाऱ्यांची ठाण्यावर धडक
By admin | Published: August 4, 2016 01:08 AM2016-08-04T01:08:31+5:302016-08-04T01:08:31+5:30
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात दिलेल्या सर्व तक्रारींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी
धरणे देणार : सर्व तक्रारींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
यवतमाळ : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात दिलेल्या सर्व तक्रारींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बुधवारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी शहर पोलीस ठाण्यावर धडकले.
१८ जुलै रोजी तीन महिला डॉक्टर आणि पाच परिचारिकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यापैकी दोनच तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला. इतर सहाचे काय झाले, गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, असा प्रश्न वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला. या प्रकरणी गुन्हा दाखल न केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे देण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी डॉ. धर्मेश चव्हाण, डॉ. किशोर कोषटवार, डॉ. महेश मनवर, अशोक जयसिंगपुरे, अनंत सावळे, रामभाऊ भगत, शंकर महले, संगीता किनाके, रासमवार, छाया बेलेकर, अर्चना गोळेकर, जयश्री बल्लाळ आदींसह अनेक आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)