‘मेडिकल’चा सुरक्षा रक्षक जेव्हा धावून येतो मजुरांच्या मदतीला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:18+5:30

एका जागरूक पत्रकाराने त्यांची विचारपूस केली अन् त्यांना थेट यवतमाळात आणले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक नामदेव पवार यांना ही माहिती मिळताच त्यांनी या सर्व मजुरांची रात्रभर निवासाची, जेवणाची व्यवस्था केली. शुक्रवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांना आवाहन करून त्यांनी ४ हजार रुपयांची वर्गणी गोळा करून या मजुरांना दिली. यवतमाळातून जळगावकडे जाण्याचा ‘रूट’ सांगून रवाना केले. अकोलापर्यंत हे मजूर पुन्हा पायी गेले.

'Medical' security guard rushes to help the laborers ..! | ‘मेडिकल’चा सुरक्षा रक्षक जेव्हा धावून येतो मजुरांच्या मदतीला..!

‘मेडिकल’चा सुरक्षा रक्षक जेव्हा धावून येतो मजुरांच्या मदतीला..!

googlenewsNext
ठळक मुद्देसंवेदनशीलता । आदिलाबादहून जळगाव प्रवास यवतमाळातून ‘सोपा’

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : त्यांचे गाव भलतेच, ते रोजगारासाठी गेले होते भलत्याच गावात अन् आता संचारबंदीमुळे अडकले होते यवतमाळ जिल्ह्यात. पण अशा अडलेल्या मजुरांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाने मदत करून त्यांच्या गावापर्यंत सहीसलामत पोहोचविले.
जळगाव जिल्ह्यातील अडावत गावातील पाच-सहा मजूर केळीचे घड तोडण्याच्या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून अदिलाबाद जिल्ह्यात गेले होते. मात्र आता कोरोनाच्या प्रकोपाने त्यांचे कामही थांबले. विशेष म्हणजे, गावाकडे परत जावे तर जाण्याची साधने नाही अन् जवळ पैसाही नाही. अशा अवस्थेत हे मजूर अदिलाबादहून चक्क पायीच जळगावकडे निघाले. गुरूवारी रात्री ९ वाजता ते यवतमाळ जिल्ह्यातील रुंझा गावापर्यंत पोहोचले. त्यावेळी एका जागरूक पत्रकाराने त्यांची विचारपूस केली अन् त्यांना थेट यवतमाळात आणले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक नामदेव पवार यांना ही माहिती मिळताच त्यांनी या सर्व मजुरांची रात्रभर निवासाची, जेवणाची व्यवस्था केली. शुक्रवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांना आवाहन करून त्यांनी ४ हजार रुपयांची वर्गणी गोळा करून या मजुरांना दिली. यवतमाळातून जळगावकडे जाण्याचा ‘रूट’ सांगून रवाना केले. अकोलापर्यंत हे मजूर पुन्हा पायी गेले. मात्र अकोल्यात त्यांना वाहन मिळाले अन् ते जळगावात स्वत:च्या घरी सहीसलामत पोहोचले. घरी पोहोचताच त्यांचा नामदेव पवार यांना आभारासाठी फोनही आला. मेडिकलमधील कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर किती संवेदनशीलपणे काम करीत आहे, याचे उदाहरण पुढे आले.

Web Title: 'Medical' security guard rushes to help the laborers ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.