वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या रॅगिंगची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 09:59 PM2018-08-27T21:59:01+5:302018-08-27T21:59:16+5:30

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वसतिगृहात काही सिनिर्यसनी १२ आॅगस्टच्या रात्री धुमाकूळ घातला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रकाशित होतच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन चौकशी समिती स्थापन केली आहे.

Medical students ragging inquiry | वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या रॅगिंगची चौकशी

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या रॅगिंगची चौकशी

Next
ठळक मुद्देसात सदस्यीय स्वतंत्र समिती गठित : १२ आॅगस्टच्या घटनेची अधिष्ठातांनी दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वसतिगृहात काही सिनिर्यसनी १२ आॅगस्टच्या रात्री धुमाकूळ घातला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रकाशित होतच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन चौकशी समिती स्थापन केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहामध्ये व परिसरात रॅगिंंग होऊच नये म्हणून प्रशासनाने पुरेपूर खबरदारी घेतली आहे. वारंवार कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना कायदेशीर कार्यवाहीबाबत अवगत केले जाते. त्यानंतरही चक्क पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असलेल्या आणि निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सिनियर्सनी आपल्या अधिनस्थ असलेल्या कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाºयांच्या वसतिगृहात गोंधळ घातला. हा प्रकार नेमका रॅगिंगचा होता की, आणखी कोणत्या वेगळ््या उद्देशाने धुमाकूळ घालण्यात आला, असे एक ना अनेक प्रश्च सध्या मेडिकल परिसरात चर्चिले जात आहे. संघटनेच्या पाठबळावर हे बेकायदेशीर कृत्य झाल्याचे सांगितले जात आहे.
या गंभीर प्रकरणाची महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी दखल घेत स्वतंत्र चौकशी समिती गठीत केली. बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. दामोधर पटवर्धन यांच्या अध्यक्षतेत या समितीमध्ये सात सदस्य आहेत. याशिवाय अँटी रॅगिंग कमेटीलाही या घटनेबाबत अहवाल मागितला आहे. या समितीचे प्रमुख डॉ. प्रभाकर हिवरकर आहेत. या दोन्ही समितीकडून अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.

Web Title: Medical students ragging inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.