‘वंचित’चा महिला कार्यकर्ता मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:13 PM2019-07-16T22:13:26+5:302019-07-16T22:13:39+5:30
वंचित बहुजन आघाडी-भारिप बहुजन महासंघातर्फे महिला कार्यकर्ता मेळावा तथा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा स्थानिक वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात घेण्यात आला. यावेळी अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अकोला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष पुष्पाताई इंगळे, शोभाताई शेळके, शोभाताई मुळे, माधुरीताई अराठे उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वंचित बहुजन आघाडी-भारिप बहुजन महासंघातर्फे महिला कार्यकर्ता मेळावा तथा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा स्थानिक वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात घेण्यात आला. यावेळी अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अकोला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष पुष्पाताई इंगळे, शोभाताई शेळके, शोभाताई मुळे, माधुरीताई अराठे उपस्थित होत्या.
याप्रसंगी अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रेरित होऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता रमाई यांच्या जीवनाची प्रेरणा घेऊन सामाजिक दायित्व पार पाडत राजसत्ता हातात घेण्याची क्षमता वंचित बहुजन समाजाच्या महिलांमध्ये आहे. यासाठी एकजुटीने कार्य करूया, असे आवाहन अंजलीताई आंबेडकर यांनी केले.
प्रास्ताविक करुणाताई मून, संचालन विजयाताई चिंचोरे यांनी केले. आभार धम्मावतीताई वासनिक यांनी मानले. मेळाव्याला रणधीर खोब्रागडे, उत्तमराव पांडे, प्रमोद राऊत, विशाल पोले, अरुणा बनसोड, दिनेश करमनकर, खंडेश्वर कांबळे, रंजना ताकसांडे, उषा खंडारे, सरला चचाने, वर्षा पडवे, पुष्पा बारसागडे, शशीताई भवरे, सुलोचना कांबळे, ज्योती वागदे, सुषमा दुधगवळी, कीर्ती लभाने, पद्मा खोब्रागडे, बबिता मेश्राम, प्रभा भगत, वंदना मून, वंदना तायडे, छाया चव्हाण, मीना काळे, साधना वानखडे, मनीषा भेले यांची उपस्थिती होती, असे जिल्हा प्रवक्ता राजा गणवीर यांनी कळविले आहे.