केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:29 PM2018-04-26T23:29:54+5:302018-04-26T23:29:54+5:30

जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची सभा येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात पार पडली. संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार आप्पासाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर लाभले होते.

Meeting of Chemists and Drugsticks Association | केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची सभा

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची सभा

Next
ठळक मुद्देकार्यकारिणी जाहीर : पंकज नानवाणी जिल्हाध्यक्ष, सचिव संजय बुरले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची सभा येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात पार पडली. संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार आप्पासाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर लाभले होते. यावेळी संघटनेची नवीन जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी पंकज नानवाणी, सचिव संजय बुरले, तर कोषाध्यक्ष म्हणून गजानन बट्टावार यांची निवड झाली आहे.
यावेळी ना. हंसराज अहीर यांचा सत्कार करण्यात आला. केमिस्टांनी आता औषधी व्यवसायासोबतच पंतप्रधानांनी राबविलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून यावेळी केले.
अध्यक्षीय भाषणात आप्पासाहेब शिंदे यांनी विविध विषयांवर माहिती दिली. यापुढे केमिस्टांनी एमएसटीसी अंतर्गत एज्यूकेशनल कोर्सेस करून जगातील ग्लोबल स्पर्धेसाठी संघटनेच्या एम+एम (मेडिसीन प्लस मोअर) या आॅर्गनाईज रिटेल शॉपीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राचे मानद सचिव अनिल नावंदर यांनी प्रत्येक केमिस्टनी स्वत:ला अपग्रेड करून ग्राहकांना औषधांव्यतिरिक्त मूल्यवर्धित सेवा पुरविण्यावर भर दिला.
यावेळी मंचावर महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद दुबे, अरुण बरकसे, कोषाध्यक्ष वैजनाथ जागुंष्टे, सहसचिव प्रसाद दानवे, अखिल भारतीय सदस्य रमण अग्रवाल, अमरावती झोन अध्यक्ष संजय पिंपळखुटे, पंकज नानवाणी, संजय बुरले, गजानन बट्टावार, राजू कोटलवार आदी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक संजय पिंपळखुटे, संचालन अतुल ढोले व प्रसाद चौधरी यांनी केले.
कार्यक्रमासाठी श्रीकांत खडतकर, दीपक बोरा, अनुप किन्हीकर, अविनाश फरकुंडे, सुधीर वाधवाणी, जेठानंद जेसवानी, ओमेश हातगावकर, दीपक कोकाटे, पंकज जन्नावार, धीरज जयस्वाल आदींनी पुढाकार घेतला.
पदाधिकारी नियुक्त
जिल्हा अध्यक्ष पंकज नानवाणी, सचिव संजय बुरले, कोषाध्यक्ष गजानन बट्टावार, उपाध्यक्ष अतुल ढोले, सुनील हरसुलकर. यवतमाळ शहर अध्यक्ष श्रीकांत खडतकर, सचिव प्रसाद चौधरी.

Web Title: Meeting of Chemists and Drugsticks Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.