जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:49 PM2017-12-18T22:49:16+5:302017-12-18T22:49:36+5:30
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार १९ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रमुख आमदारांची बैठक घेत आहेत. यात जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार १९ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रमुख आमदारांची बैठक घेत आहेत. यात जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दुपारी ३ वाजता ही बैठक होत आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व खाते प्रमुखांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. शासनाच्या योजना, विकास कामे, शेतकºयांचे प्रश्न, कर्जमाफी, पाणीटंचाई या प्रमुख मुद्यांवर ही बैठक होणार असल्याची माहिती आहे.
शासनाच्या कर्जमाफी योजनेचा नेमका किती शेतकºयांंना लाभ मिळाला, किती बँक खात्यांमध्ये रकमा जमा झाल्या, जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीचे बळी किती, त्यांना मिळालेली मदत, बोंडअळींचे नुकसान, कापूस उत्पादक शेतकºयांना भरपाई यावर भर राहणार आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने आतापासूनच भीषण पाणीटंचाईची चिन्हे दिसू लागली आहे. यवतमाळातील पाणीटंचाईवर बेंबळाची पाईपलाईन हा सक्षम पर्याय आहे. बेंबळावरून शक्य तेवढ्या लवकरच गोधनी स्थित जलशुद्धीकेंद्रापर्यंत पाणी पोहोचविण्याचे आव्हान जीवन प्राधिकरण आणि शासनापुढे आहे. हे काम वेळेत झाल्यास यवतमाळकरांना या उन्हाळ्यात प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे. अन्यथा पिण्याच्या पाण्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. ग्रामीण मधील स्थितीही या पेक्षा वेगळी राहणार नसल्याचे सांगितले जाते.