मारेगाव येथे शेतकरी सभासद मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:43 AM2021-09-11T04:43:13+5:302021-09-11T04:43:13+5:30
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वसंत जिनिंगचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे, उपाध्यक्ष प्रशांत ...
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वसंत जिनिंगचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे, उपाध्यक्ष प्रशांत गोहोकार, बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाजी खंडाळकर, पंचायत समिती सभापती शीतल पोटे, जिल्हा परिषद सदस्या अरूणा खंडाळकर, अनिल देरकर, बाजार समितीचे उपसभापती वसंत आसूटकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारोती गौरकार, वसंत जिनिंगचे संचालक उदय रायपुरे, खालिद पटेल आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांची समृद्धी ही खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्रातूनच होऊ शकते. वणी विभागात सूतगिरणी, वसंत जिनिंगच्या माध्यमातून सहकार क्षेत्र मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु दुर्दैवाने सहकार क्षेत्र फोफावू शकले नाही. त्यामुळे सहकारातून शेतकरी समृद्धीच्या दिशेने जाऊ शकला नाही, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. या मेळाव्याला तालुक्यातील सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय रायपुरे यांनी केले. प्रेमकुमार खुराणा यांनी सूत्रसंचालन केले. सुनील वरारकर यांनी आभार मानले. या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी शेखर जोगी, राजाभाऊ पाथ्रडकर, यादव काळे, तुळशीराम कुमरे, पांडुरंग रोगे आदींनी सहकार्य केले.