आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:05 PM2018-08-22T22:05:21+5:302018-08-22T22:06:07+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे रखडलेले प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्यासोबत सभा घेण्यात आली. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सभेमध्ये प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्याआरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे रखडलेले प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्यासोबत सभा घेण्यात आली. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सभेमध्ये प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती प्रकरणे, रिक्त पदे भरणे, सेवापुस्तकांचे अद्यावतीकरण, बदली झालेल्या आणि बदलून आलेल्या कर्मचाºयांचे वेतन, रखडलेले वैद्यकीय देयके, भविष्य निर्वाह प्रकरणे, आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर व थकबाकी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात डाटा एंट्री आॅपरेटरची नियुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहन दुरुस्तीसाठी निधी, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रतीक्षालय आदी विषयांवर शिष्टमंडळाने बाजू मांडली. चर्चेनंतर सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दुर्योधन चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी राष्ट्रीय मुलनिवास बहुजन कर्मचारी ट्रेड युनियनतर्फे अध्यक्ष नरेंद्र वासनिक, उपाध्यक्ष राजेश वाडी, कार्याध्यक्ष अनिल जयसिंगपुरे, सरचिटणीस शंकर महल्ले, कोषाध्यक्ष हेमलता वैद्य, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर कोषटवार, प्रभारी प्रशासकीय अधिकारी, व्ही.एस. रेवडी, सहाय्यक प्रशासन अधिकारी व्ही.जी. गुल्हाने, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एन.यू. राऊत, लेखा व अर्थविभागाचे गजानन डाफे, मनोज खोडे, गणेश चिंडाले आदी उपस्थित होते.