कळंब येथील शहीद स्मारक दुर्लक्षित अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 10:14 PM2017-08-08T22:14:27+5:302017-08-08T22:15:01+5:30

इंदिरा गांधी चौकात शहीदांचे स्मारक ४६ वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत खितपत पडलेले आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे,....

The memorial of the memorial at Kalamb is neglected | कळंब येथील शहीद स्मारक दुर्लक्षित अवस्थेत

कळंब येथील शहीद स्मारक दुर्लक्षित अवस्थेत

Next
ठळक मुद्देइंदिरा गांधी चौकात शहीदांचे स्मारक ४६ वर्षांपासून दुर्लक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : इंदिरा गांधी चौकात शहीदांचे स्मारक ४६ वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत खितपत पडलेले आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी स्मारक समिती व गावकºयांची अनेक वर्षांपासूनची आहे़ परंतु स्मारकावरुन राजकारण करण्यापलीकडे एकाही राजकीय पक्षाचे काम पुढे सरकले नाही.
विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज काळे व भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हा विषय विरोधी पक्षात असताना जोरकसपणे मांडला. एवढेच नव्हे तर उपोषणाचेही हत्यार उपसण्यात आले होते. त्यामुळेच मागासक्षेत्र अनुदान विकास निधीतून निधीची तरतूद करण्यात आली़ परंतु मागील सात वर्षांपासून स्मारक बांधकामाला मुहूर्तच सापडलेला नाही़ दुसरीकडे स्मारक समिती नेमणाºयांनी समिती स्थापण्यातच धन्यता मानली. त्यापुढे त्यांचे पाऊल सरकलेच नाही. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. आता तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. महत्वाचे म्हणजे ज्यांनी हा विषय सातत्याने उपस्थित केला तेच मनोज काळे आता उपनगराध्यक्ष आहे. बांधकाम सभापती आशिष धोबे हेही या समितीत आहे. त्यांच्याकडे मागील दोन वर्षांपासून सत्ता असनूही शहीद स्मारकाचा विषय बाजूला ठेवला आहे. विरोधी पक्षात असताना शहीद स्मारकासाठी रान उठवायचे आणि सत्तेत आल्यानंतर मूग गिळून बसायचे, ही कुठली कार्यपद्धती आहे, असा प्रश्न आता जनतेतून विचारला जातो.
देश पारतंत्र्यात असताना तालुक्यातील वीरांनी स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेऊन लढ्यात उडी घेतली़ यामध्ये रामभाऊ महादेव माळी़, वासूदेव दाजीबा आष्टीकर, महादेव शिवराम माळी व चंपत मराठा या चौघांना वीर मरण आले़ त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थच कळंब येथील इंदिरा गांधी चौकात १९७३ साली शहीद स्मारक उभारण्यात आले़ परंतु काळाच्या ओघात याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले़ परिणामी स्मारकाच्या सभोवताल अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले़ त्यामुळे हे स्मारक दिसेनासे झाले आहे. वास्तविकपणे शहीद स्मारकांचे सौंदर्यीकरण व स्मृती जपण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे़ परंतु तेही आपली जबाबदारी निट पार पाडताना दिसून येत नाही. मागील ४६ वर्षात मंत्री, खासदार-आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी स्मारकांच्या सौंदर्यीकरणासाठी अनेकदा आश्वासन दिले़ परंतु त्यांनी आपला शब्द पाळला नाही.

Web Title: The memorial of the memorial at Kalamb is neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.