पुसद प्रकल्पातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:48 AM2021-08-13T04:48:03+5:302021-08-13T04:48:03+5:30
तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा हर्षी येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मरसूळ येथील महात्मा मुंगसाजी आदिवासी शिक्षण संस्थेद्वारे संचालित महात्मा ...
तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा हर्षी येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मरसूळ येथील महात्मा मुंगसाजी आदिवासी शिक्षण संस्थेद्वारे संचालित महात्मा मुंगसाजी आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे प्रकल्पातून प्रथम आल्याबद्दल नऊ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यात दहावीतील विशाखा टाले ९३.४०, गोपाल शेळके ९०.८०, बारावी विज्ञान शाखेतून शुभम दुम्हारे ९०.६७, श्रीकांत खोकले ८९.१७, गौरव मोहाडे ८९.१७, अविनाश डाखोरे ८९.१७ टक्के यांचा समावेश आहे. एकूण १५ गुणवंत विद्यार्थ्यांपैकी मरसूळचे नऊ विद्यार्थी गुणवंत ठरले. यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सावन कुमार, गीतांजली कदम, भाऊ अहीर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, अध्यक्ष जितेंद्र मोघे, सचिव ज्ञानेश्वर तडसे, संचालक लीलाधर मळघणे, मुख्याध्यापक ए.जी. सय्यद आदींनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.