ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:26 PM2017-10-29T22:26:12+5:302017-10-29T22:26:35+5:30

तालुक्यातील बंजारा समाजातील ऊसतोड कामगारांनी ऊसाच्या फडाची वाट धरल्याने तालुक्यातील तांडे-वाड्या ओस पडत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

Migration of sugarcane laborers | ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

googlenewsNext
ठळक मुद्देतांडे-वाडे पडले ओस : पुसदच्या बाजारपेठेतही शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यातील बंजारा समाजातील ऊसतोड कामगारांनी ऊसाच्या फडाची वाट धरल्याने तालुक्यातील तांडे-वाड्या ओस पडत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
यावर्षी अपुºयापावसामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबला आहे. त्यात आॅक्टोबरच्या मध्यात दिवाळी सणाला तब्बल २० वर्षानंतर कामगारांना दिवाळी घरी साजरी करता आली. आता कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने ऊस तोड मजुरांनी उसाच्या फडाची वाट धरली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ऊस तोड कामगार पुसद तालुक्यात आहे. हे कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी साखर कारखान्यांची वाट धरतात. यातील बहुतांश साखर कारखाने पश्चिम महाराष्टÑ आणि मराठवाड्यात आहे.
दरवर्षी दिवाळीपूर्वीच गाळप हंगाम सुरू होतो. मात्र यावर्षी दिवाळी आधी आल्याने ऊस तोड कामगारांना घरीच दिवाळी साजरी करता आली. आता हे कामगार ऊस तोडणीसाठी स्थलांतर करू लागले आहे. तालुक्यातील अनेक तांडे व वस्त्या ओस पडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे युवक वर्गही कामासाठी मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत. हे कामगार ठेकेदारांकडून पैसे उसने घेऊन इतर वेळी आपला संसार चालवितात. ऊस तोडीच्या कामातून ते पैशाची परतफेड करतात. नवरा आणि बायको अशी एक जोडी म्हणजे ‘कोयता’ असे संबोधले जाते. ऊस तोडीसाठी असे हजारो ‘कोयते’ तालुक्यातून स्थलांतरित होत आहे. त्यामुळे या मजूर वर्गांच्या मुलांच्या शिक्षणाची मात्र हेळसांड होत आहे.
५० हजारांची अनामत
ऊस तोड ठेकेदार एका जोडप्याला ५० हजार रुपये अग्रीम देतात. ऊस तोडणीनंतर हे पैसे ठेकेदार परत घेतो. जादा काम झाल्यास ती रक्कम मजुरांनाच मिळते. या उचल केलेल्या पैशातून संसार भागविला जातो. त्यातूनच विवाह व सण साजरे केले जातात. जिल्ह्यात व लगत साखर कारखाने नसल्याने अनेकांची इच्छा नसूनही त्यांना ऊस तोडणीसाठी स्थलांतर करावे लागते.

Web Title: Migration of sugarcane laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.