लाखो रुपयांचे सागवान बेवारस

By admin | Published: August 28, 2016 12:10 AM2016-08-28T00:10:29+5:302016-08-28T00:10:29+5:30

दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे सागवान वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. मागील तीन महिन्यांपासून बेवारस स्थितीत हे वृक्ष आहेत.

Millions of rupees are worthless | लाखो रुपयांचे सागवान बेवारस

लाखो रुपयांचे सागवान बेवारस

Next

समूळ उखडली वृक्ष : दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र
सावळीसदोबा : दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे सागवान वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. मागील तीन महिन्यांपासून बेवारस स्थितीत हे वृक्ष आहेत. वनविभागाकडून या वृक्षांची विल्हेवाट लावली जात नाही. या सागवानावर कधी हातआरी चालेल याची वाट तर वनविभागाचे अधिकारी पाहात नसावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रांतर्गत सावळीसदोबा विभागासह ३१ कक्ष आहेत. यामध्ये इचोरा, राणीधानोरा, कुऱ्हा, अंतरगावपर्यंत जवळपास २० किलोमीटर अंतरामध्ये दक्षिण आर्णी क्षेत्र आहे. या सर्व कक्षामध्ये कोट्यवधी रुपयांचे सागवान पडून आहे. मे आणि जूनमध्ये आलेल्या वादळामुळे १०० वर्षापूर्वींची झाडे कोसळलेली आहे. गेली तीन महिन्यांपासून याकडे वनविभागाने थोडेही लक्ष दिलेले नाही.
दक्षिण आर्णी-सावळी वनक्षेत्रापासून विदर्भ-मराठवाडा ही सीमा शून्य किलोमीटरमध्ये आहे. या आधी दक्षिण आर्णीमधील चोरीचे सागवान मराठवाड्यातून जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह दोन वनपाल, दोन वनरक्षक आणि एका वनमजुरावर निलंबनाची कारवाई झाली होती.
या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नव्याने रुजू झालेले उपवनसंरक्षक हिंगे यांनी दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र, सावळीसदोबा परिसरातील जंगलाची पाहणी करून उन्मळून पडलेल्या वृक्षांची विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे रस्त्यावरून जातानाही ही वृक्ष सहज दृष्टीस पडतात. त्यावर चोरट्यांची नजर पडण्यापूर्वी विल्हेवाट लावली जावी, अशी मागणी आहे. कक्ष क्र. ७ व ८ ची परिस्थितीही दयनीय आहे. या भागात अनेक थुटं पाहावयास मिळतात. वनविभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Millions of rupees are worthless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.