लाखो रूपयांचे जनरेटर धूळ खात पडून

By admin | Published: November 23, 2015 02:15 AM2015-11-23T02:15:45+5:302015-11-23T02:15:45+5:30

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळांमध्ये लाखो रुपये खर्च करून २० जनरेटर खरेदी करण्यात आले होते.

Millions of rupees generator fall into dust | लाखो रूपयांचे जनरेटर धूळ खात पडून

लाखो रूपयांचे जनरेटर धूळ खात पडून

Next

शिवानंद लोहिया हिवरी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळांमध्ये लाखो रुपये खर्च करून २० जनरेटर खरेदी करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत हे जनरेटर धूळ खात पडले असल्याचे दिसून येते. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे.
जिल्ह्यातील आश्रमशाळांसाठी २० जनरेटरची खरेदी दोन लाख ४५ हजार ९४७ रुपये प्रतिनग या दराने १९ मार्च २०११ रोजी मे.जी.एस. एन्टरप्रायजेस मुंबई यांच्याकडून खरेदी करण्यात आले होते. अमरावती अपर आयुक्त व जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार ही खरेदी आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील २० आश्रमशाळेत हे २० जनरेटर पोहोचविण्यात आले. परंतु आजमितीस पाच वर्षानंतरही ते सुरू करण्यात आले नाही. विद्यार्थ्यांना या जनरेटरचा कोणताही उपयोग झालेला नाही. त्यामुळे शासनाने ६५ लाख ६६ हजार १२० रुपये पाण्यात गेल्याचेच सध्या तरी दिसून येते. यामध्ये नेमके काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांसोबतच शिक्षकांनाही पडला आहे. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या विशेष निधीअंतर्गत ही खरेदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता व आदिवासी अपर आयुक्तांच्या आदेशानंतर प्रकल्प कार्यालयाने खरेदीची प्रक्रिया पार पाडली. आता ही खरेदी नियमबाह्य झाल्याने हा वाद न्यायालयात पोहोचल्याची माहिती आहे. या प्रकरणी सत्यता बाहेर येणे गरजेचे आहे. विद्यार्थी हिताच्या ज्या हेतूने हे जनरेटर खरेदी करण्यात आले तो हेतू अद्यापही साध्य झाला नाही. जनरेटर असेच पडून राहिल्यास अर्थातच त्यांची कार्यक्षमता कमी होईल. एकीकडे शासन आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देते, तर दुसरीकडे भ्रष्टाचारी लोकांमुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात बुडत आहेत. या बाबत सविस्तर चौकशी होऊन दोषींवर कारवाईची गरज आहे.

Web Title: Millions of rupees generator fall into dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.