‘एमआयएम’ने सोनू निगमचा पुतळा जाळला

By Admin | Published: April 20, 2017 12:29 AM2017-04-20T00:29:48+5:302017-04-20T00:29:48+5:30

मशिदीवरून होणाऱ्या अजानमुळे माझी रोज झोपमोड होते, असे वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम ...

'MIM' burnt the statue of Sonu Nigam | ‘एमआयएम’ने सोनू निगमचा पुतळा जाळला

‘एमआयएम’ने सोनू निगमचा पुतळा जाळला

googlenewsNext

अजानबाबत वादग्रस्त वक्तव्याचा निषेध : कळंब चौकात आंदोलन, घोषणाबाजी
यवतमाळ : मशिदीवरून होणाऱ्या अजानमुळे माझी रोज झोपमोड होते, असे वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम समाजबांधवांच्या भावना दुखावणाऱ्या सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मंगळवारी रात्री येथील कळंब चौकात दहन करण्यात आले.
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाज अहमद यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी अचानक आंदोलनाची भूमिका घेऊन प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याने पोलीस यंत्रणेची धावाधाव झाली. या आंदोलनाच्या वेळी मुस्लिम समाजबांधव आणि युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी सोनू निगमविरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदविला. त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही केली गेली.
यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाज अहेमद व इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात अहेमद एजाज, कुरेशी, महंमद आसीम अली, इर्शाद अहेमद, डॉ.अन्सारी, मन्सूर अहेमद आदींसह एमआयएमचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)

Web Title: 'MIM' burnt the statue of Sonu Nigam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.