मंत्र्यांच्या दौऱ्याला अधिकाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 09:59 PM2018-10-22T21:59:05+5:302018-10-22T21:59:26+5:30
महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड यांनी रविवारी तालुक्यात शिवारफेरी मारली. या शिवारफेरीला दांडी मारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शो कॉज नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड यांनी रविवारी तालुक्यात शिवारफेरी मारली. या शिवारफेरीला दांडी मारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शो कॉज नोटीस बजावण्यात आली आहे.
महसूल राज्यमंत्री राठोड यांनी रविवारी तालुक्यातील काही गावांचा दौरा केला. त्यांनी चिखली, मलकापूर, तिवरंग, उटी आदी परिसरातील शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. हा शासकीय दौरा असताना काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. अशा सर्व अधिकारी व कर्मचाºयांना राज्यमंत्र्यांच्या निर्देशावरून तहसीलदार नामदेव इसाळकर यांनी शो कॉज नोटीस बजावली आहे.
दौºयात सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता, सिंचन उपअभियंता, वीज वितरणचे उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकामचे उपअभियंता, गटविकास अधिकारी गैरहजर होते. या सर्वांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, रविवारी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची मंत्र्यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर तालुक्यात दुष्काळ घोषित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी अनेक शेतकºयांनी त्यांच्यापुढे समस्या मांडल्या. तसेच सिंचन आणि वीज वितरणच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलाविले असताना काही अधिकारी उपस्थित झाले नाही. या दौºयात आमदार राजेंद्र नजरधने, रामराव नरवाडे, समाधान ठाकरे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, तहसीलदार नामदेव इसाळकर उपस्थित होते.