अल्पसंख्यकांच्या वसाहतीतील प्रश्न पालकमंत्र्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 09:59 PM2019-07-09T21:59:39+5:302019-07-09T22:00:35+5:30
शहरातील अल्पसंख्याक समाजाची मोठी संख्या असलेल्या वसाहतींमध्ये निर्माण झालेले प्रश्न पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे मंगळवारी मांडण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याची समस्या आहे. ही कामे तातडीने करण्याचे निर्देश ना. येरावार यांनी संबंधितांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील अल्पसंख्याक समाजाची मोठी संख्या असलेल्या वसाहतींमध्ये निर्माण झालेले प्रश्न पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे मंगळवारी मांडण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याची समस्या आहे. ही कामे तातडीने करण्याचे निर्देश ना. येरावार यांनी संबंधितांना दिले.
शहरातील शादाब बाग, गोल्डन पार्क, नवरंग सोसायटी, गुलशननगर, कापसे ले-आऊट, रचना सोसायटी, नागसेन सोसायटी, शर्मा ले-आऊट या भागामध्ये रस्त्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. सदर भाग २०१४ पासून नगरपरिषदेमध्ये समाविष्ट झाला. त्यापूर्वी नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीतही नसलेल्या या भागामध्ये कुठलीही विकास कामे झाली नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केले.
विकासापासून दूर असलेल्या या भागात रस्त्याचा प्रश्न भीषण झाला आहे. जागोजागी तयार झालेल्या डोबऱ्यामुळे मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. वाढलेल्या गाजरगवतामुळे सरपटणाºया प्राण्यांपासून धोका निर्माण झाला आहे. या समस्या तत्काळ निकाली काढल्या जाईल, असे आश्वासन ना. येरावार यांनी शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळामध्ये जिल्हा काँग्रेसचे महासचिव नगरसेवक जावेद अन्सारी, राष्ट्रवादीचे तारीक साहीर लोखंडवाला, काँग्रेस अल्पसंख्यक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शब्बीर खान, जुल्फीकार अहमद, बबलीभाई, शकील पत्रकार, जावेद अख्तर, हुसैन खान, आरिफ खान, राजू खान, बाबा काझी, मोहम्मद फारूख, मोहसीन खान, शाकीर नजीब अहमद, शाकीर अहमद पत्रकार, सैयद जाकीर, मुजफ्फर पटेल, अहमद शाह, शकीलभाई, नईम पहलवान, आसीफभाई, रिजवानभाई, सुहैल काझी, कलीम काझी, आबीद अली आदींचा समावेश होता.