पोहणा ते भुरकी रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:50 AM2021-09-09T04:50:17+5:302021-09-09T04:50:17+5:30
गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी गावकरी करत आहे. मात्र तरीही शासन गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत ...
गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी गावकरी करत आहे. मात्र तरीही शासन गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांनी शेती न करणे हा पर्याय निवडला आहे, तर काही शेतकऱ्यांनी या रस्त्याचा त्रासापोटी नगदी पिके न घेता सागवान झाडांची लागवड केली आहे. या रस्त्यावरील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल आहे. परंतु रस्त्याअभावी त्यांना कोणतीही पिके घेता येत नाही. या रस्त्याबाबत नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे ही साकडे घातले. मात्र लोकप्रतिनिधी ही पोकळ आश्वासन देऊन मोकळे होतात. या चिखलमय रस्त्याने येणाऱ्या-जणाऱ्या शेतकरी, विद्यार्थ्यांना पावसाळ्यात तर अक्षरशः चिखल तुडवत जावे लागते. त्यामुळे आता तरी शासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी विठ्ठल गोबाडे, गोपाळ डोंगे, नंदकिशोर गोहोकर, प्रभाकर राजूरकर, संजय चहानकार, दिलीप चामाटे यांनी दिला आहे.