पुनर्वसनाबाबत मुंगोलीवासीयांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:08 PM2018-06-14T22:08:28+5:302018-06-14T22:08:28+5:30

The misguided misgivings about rehabilitation | पुनर्वसनाबाबत मुंगोलीवासीयांची दिशाभूल

पुनर्वसनाबाबत मुंगोलीवासीयांची दिशाभूल

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : २१ ला गावकरी करणार रास्ता रोको आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : जून २०१८ पर्यंत मुंगोली गावाचे पुनर्वसन पूर्ण होईल, या प्रशासनाच्या आश्वासनाला हरताळ फासल्या गेला असून पुनर्वसनाच्या विषयात गावकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. यासंदर्भात मुंगोलीचे सरपंच रूपेश ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चार दिवसात ठोस निर्णय घ्यावा अन्यथा २१ जून रोजी ‘कोयला यातायात रोको आंदोलन’ करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंगोली परिसरात कोळसा खाण होत असल्याने या परिसरातील नागरिक सुखावले होते. हाताला काम मिळेल, अशी अपेक्षा बेरोजगारांना होती. मात्र पुढे मुंगोली निर्गुडा डीप वाढीव प्रकल्प सुरू केल्यानंतर आपली फसवणूक होत आहे, याचा प्रत्यय मुंगोलीवासीयांना आला. स्फोटाचे हादरे, प्रदूषणाचा त्रास, मातीचे मोठमोठे ढिगारे, पाण्याचा दुष्काळ, कोळशाच्या धुळीचा शेतपिकावर होणारा दुष्परिणाम, या आणि अशा अनेक समस्या खाणीमुळे निर्माण झाल्या.
पुनर्वसन नियोजनाअंतर्गत ९ मे २०१६ रोजी वेकोलि प्रशासनाने मुंगोली गावाचा पुनर्वसन कृती आराखडा ग्रामस्थांना दिला व एप्रिल २०१८ पासून दोन महिन्यात म्हणजेच जून २०१८ पर्यंत मुंगोली गावाचे पुनर्वसन करण्याचा लेखी उल्लेख त्या आराखड्यात करण्यात आला. त्यात वणीच्या भूमिअभिलेख कार्यालयाकडून टी.आर.एल.आर. सर्व्हे करण्यात आला. तसेच एनजीओमार्फत कुटुंब सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घरांचे अर्धवट मुल्यांकन करण्यात आले. या कामातच जून महिना निघून जात आहे. परंतु आजही मुंगोली गावाचे पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे या कृती आराखड्याला अर्थ तरी काय, असा प्रश्न गावकºयांकडून उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात मुंगोली ग्रामपंचायतीकडून प्रशासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. कृती आराखड्याचा खोटेपणा ड्रगलाईन मशिन न वापरण्याचे दिलेले आश्वासन, एप्रिल २०१८ पासून दोन महिन्यात पुनर्वसन करण्याचे आश्वासन, पुनर्वसन स्थळासंदर्भात अद्यापही थंडबस्त्यात असलेली कारवाई, याचा निषेध म्हणून २१ जून रोजी मुंगोली येथे कोयला यातायात रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: The misguided misgivings about rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप