मनसेने घेतली शिक्षण, लग्नाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 09:39 PM2018-04-14T21:39:02+5:302018-04-14T21:39:02+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यातील राजूरवाडी येथील शंकरराव भाऊराव चायरे या आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी उचलली आहे.

MNS took education, marriage responsibility | मनसेने घेतली शिक्षण, लग्नाची जबाबदारी

मनसेने घेतली शिक्षण, लग्नाची जबाबदारी

googlenewsNext
ठळक मुद्देराजूरवाडीचे कुटुंब : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, मुख्यमंत्री निधीतून मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यातील राजूरवाडी येथील शंकरराव भाऊराव चायरे या आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी उचलली आहे. सोबतच या कुटुंबाला मदत देण्याबाबत शासनाला बुधवारी निवेदन दिले.
मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी बुधवारी शिष्टमंडळासह उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांची भेट घेतली. त्यांच्याकडे आत्महत्याग्रस्त शेतकरी शंकरराव चाहारे यांच्या कुटुंबियास मुख्यमंत्री निधीतून तत्काळ मदत देण्याची मागणी केली. तसेच मृतकाच्या कुटुंबातील वारसाला शासकीय नोकरी द्यावी, त्यांचे बँकेचे कर्ज त्वरित माफ करावे, बोंडअळीची नुकसान भरपाई त्वरित द्यावी, आदी मागण्या केल्या. एकीकडे शेतकरी आत्महत्येचे राजकीय भांडवल केले जात असताना राजू उंबरकर यांनी चायरे यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची व लग्नाची जबाबदारी उचलली. यापूर्वी उंबरकर यांनी अनेकदा गरजूंच्या मदतीसाठी धाव घेतली. याप्रसंगी मनसेचे तिरूपती कुंदकुरीवार, सादिक रहमान, संजय देठे, सुधाकर झोटिंग, मनोज झोपाटे, प्रदीप तडसकर, सचिन येलगंधेवार, नंदकिशोर नेहारे, विकास पवार आदी उपस्थित होते.

Web Title: MNS took education, marriage responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे