महागावात मोबाईल जुगारातून लाखोंची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:45 AM2021-05-20T04:45:11+5:302021-05-20T04:45:11+5:30
तालुक्यात सुरू झालेल्या जुगाराने वैतागलेल्या गावकऱ्यांनी याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ...
तालुक्यात सुरू झालेल्या जुगाराने वैतागलेल्या गावकऱ्यांनी याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास धाड घातली. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी दिली. मोबाईल जुगाराने सध्या तालुक्यात कहर केला आहे. कलगाव शिवारात शेतातील बंगल्यात याचे बस्तान आहे. महागाव, पुसद, उमरखेड, नांदेड, माहूर अशा अनेक ठिकाणावरील जुगाराचे शौकीन लाखोंची उलाढाल करीत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त तक्रारीनुसार अन्य काही गुन्ह्यातील आरोपी शोधायचे होते. सोबतच मोबाईल जुगारावर कारवाई करायची होती. धाडीमध्ये दोन तरुण आढळून आले. मात्र, इतर कोणतेही साहित्य किंवा अन्य आरोपी मिळून आले नसल्याचे परदेशी यांनी सांगितले. खेळणाऱ्यापैकीच एकाने दिलेल्या माहितीवरून खेळातील बावन पत्ते आणि बेस काढावयाची कॅश पेटी, दोन तरुण या ठिकाणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला आढळून आले.
ज्या ठिकाणी जुगार भरवला जातो, तेथे बाहेरची शौकीन मंडळी जमत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. मोबाईल जुगारापासून व झालेल्या कारवाईपासून जिल्हा पोलीस अधीक्षकांना संबंधित यंत्रणेने अंधारात ठेवल्याचे सांगितले जाते.