दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्याला ‘मोबाईल टीचर’ने दिली नवी दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 09:52 PM2019-07-15T21:52:28+5:302019-07-15T21:54:22+5:30
दिव्यांग मुलांना शिक्षणासाठी इतरत्र पाठविण्यासाठी पालक तयार नसतात. यामुळे चार भिंतीतच या मुलांचे आयुष्य बंदिस्त होते. मात्र जिल्ह्यातील ६१ मोबाईल टिचरमुळे आता अशा मुलांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत आहे. जिल्ह्यातील सात हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिव्यांग मुलांना शिक्षणासाठी इतरत्र पाठविण्यासाठी पालक तयार नसतात. यामुळे चार भिंतीतच या मुलांचे आयुष्य बंदिस्त होते. मात्र जिल्ह्यातील ६१ मोबाईल टिचरमुळे आता अशा मुलांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत आहे. जिल्ह्यातील सात हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे.
कर्णबधीर, मतिमंद आणि दृष्टीदोष असणारे आठ हजार पाचशे ३७ विद्यार्थी जिल्ह्यात आहेत. यातील सात हजार ३११ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेताना त्यांना विविध अडचणी येतात. त्यासाठी मोबाईल टिचर उपयुक्त ठरत आहे.
गावातल्या शाळेतूनच शिक्षण मिळावे म्हणून मोबाईल टिचरची नियुक्ती करण्यात आली अहे. या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण मिळाले आहे. संवर्गनिहाय शिक्षक आणि त्याच्या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. मोबाईल टिचर दिव्यांग विद्यार्थी असणाऱ्या शाळामध्ये जाऊन मार्गदर्शन करतात. पूर्वी आठवीपर्यंतच मोबाईल टिचरची व्यवस्था होती. आता बारावीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था शाळेत करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ६१ मोबाईल टिचर काम करीत आहे. प्रत्येक शिक्षकाकडे दोन ते तीन केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली आहे.
- ज्योती बोरकर, समन्वयक,
अपंग समावेशित शिक्षण