सिंगदच्या आधुनिक रोपवाटिकेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 10:24 PM2018-04-07T22:24:07+5:302018-04-07T22:24:07+5:30
तालुक्यातील सिंगद येथील आधुनिक आणि उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकेची मुख्य वनसंरक्षकांनी पाहणी केली. त्यांनी तेथील पॉली हाऊस व ग्रीन हाऊसचे उदघाटनही केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यातील सिंगद येथील आधुनिक आणि उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकेची मुख्य वनसंरक्षकांनी पाहणी केली. त्यांनी तेथील पॉली हाऊस व ग्रीन हाऊसचे उदघाटनही केले.
यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक राहुङकर यांनी सिंगद येथील रोपवाटिकेला भेट दिली. त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने रूट टेनरचा उपयोग करून एकाचवेळी कमी खर्चात व लवकर रोपे तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवङीकरिता चांगली व दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कामी लागली आहे. सिंगद येथील रोपवाटिकेत निर्मित गांङूळखत, गोमुख नेत्र याची मुख्य वनसंरक्षकांनी पाहणी केली.
या रोपवाटिकेत ५० मोठी उंच १८ महिन्यांची रोपे व १० हजार लहान रोपे सया तयार झली आहे. त्यात साग, मोह, बिबा, करंज, शिशु, बांबू , हिरडा, बिहाङा, चंदन आदी २८ प्रजातींच्या रोपांचा समावेश आहे. या रोपांची निर्मिती व वाढ याबाबत मुख्य वनसंरक्षकांनी माहिती घेतली. यावेळी उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या पॉली हाऊस व ग्रीन हाऊसचे त्यांनी उदघाटन केले. या रोपवाटिकेवर वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद धोत्रे देखरेख करीत आहेत.