शेतकऱ्यांच्या योजनांना आधुनिकतेची जोड

By admin | Published: July 25, 2016 12:55 AM2016-07-25T00:55:57+5:302016-07-25T00:55:57+5:30

शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. परंतु योजनांची माहितीच नसल्यामुळे असंख्य शेतकरी यापासून वंचित राहतात.

Modernization of farmer schemes | शेतकऱ्यांच्या योजनांना आधुनिकतेची जोड

शेतकऱ्यांच्या योजनांना आधुनिकतेची जोड

Next

एका क्लिकवर माहिती : सोनल झोळ यांचे अ‍ॅप्स्
यवतमाळ : शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. परंतु योजनांची माहितीच नसल्यामुळे असंख्य शेतकरी यापासून वंचित राहतात. ही बाब हेरून येथील जिल्हाधिकारी कार्र्र्र्यालयात ज्युनिअर प्रोग्रॅमर म्हणून कार्यरत असणाऱ्या सोनाली सुभाषराव झोळ यांनी अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप तयार केले आहे. याद्वारा शेतकऱ्यांना एका क्लिकवर योजनेची माहिती मिळणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ज्युनिअर प्रोग्रॅमर म्हणून कार्यरत असलेल्या सोनलने दैनंदिन कार्र्यालयीन कामकाजासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या हेरून आपल्या तांत्रिक कौशल्याचा पुरेपूर वापर केला. ग्रामीण भागात आज प्रत्येक शेतकरी कुटुंबात स्मार्ट फोन वापरते. या माध्यमातून इंटरनेटची जोडणीही घरोघरी पोहचली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजना, शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकत्रितपणे कशी, देता येईल यासाठी सोनलने प्रयत्न सुरू केले. तिने महाराष्ट्र शासनाने अधिकृत वेबसाईटस्चा आराखडा डोळ्यासमोर ठेवला. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या अ‍ॅप्स्मध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या कार्यालयांची वेबसाईटस्, लिंकअप् केली. या शिवाय कृषी विषक पूरक जोडधंद्यांची माहिती, कृषीवर आधारित विविध उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, विविध पिकांच्या लागवडी बाबतचे तंत्रज्ञान, कुठल्या पिकाला कोणते हवामान पोषक ठरू शकते याची माहिती, जमिनीचे प्रकार, पूर्व मशागत, बीज प्रक्रिया, पेरणीची योग्य वेळ, पेरणीच्या वेळी घ्यावयाची काळजी, बी-बीयाण्यांच्या विविध जाती, पिकांरूप वापरण्यात येणारी तणणाशके अशी इत्थंभूत माहिती या अप्स्मध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्याला ‘बळीराजा हितार्थ अ‍ॅप्स’् असे नाव दिले आहे.
हा अँन्ड्राईड अ‍ॅप असल्याने कुठल्याही फोनमध्ये सहज आॅपरेट करता येऊ शकेल. प्ले स्टोअरमधून हा अ‍ॅप डाऊनलोड करणे सहज शक्य होणार आहे. इतर अ‍ॅप्स्प्रमाणे याचाही योग्य व उपयुक्त असा वापर करता येणे सहज शक्य आहे. या अ‍ॅपमध्ये हवामानाचा अचूक अंदाज घेता येणार आहे. हवामानानुसार शेतीत करावयाचा बदल व इतर सर्व माहिती, बाजारभाव, नाविन्यपूर्ण योजना, तसेच सर्व इच्छूक व्यक्तींचे अभिप्राय व प्रतिसाद देण्याची सोयसुद्धा या अ‍ॅपने उपलब्ध करून देणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी अभ्यासक व सर्वसामान्यांनाही या अप्सॅचा अतिशय चांगला उपयोग होणार असल्याचे सोनल झोळ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Modernization of farmer schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.