पांढरकवडा येथील साजीद टोळीवर ‘मोक्का’

By admin | Published: April 13, 2016 02:44 AM2016-04-13T02:44:27+5:302016-04-13T02:44:27+5:30

पांढरकवडा तालुक्यातील ट्रक चालकाच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या कुख्यात शेख साजीद शेख गफ्फार ...

'Mokka' on Sajid Touji at Pandharwada | पांढरकवडा येथील साजीद टोळीवर ‘मोक्का’

पांढरकवडा येथील साजीद टोळीवर ‘मोक्का’

Next

महामार्गावर ट्रक चालकाच्या खुनातील आरोपी : मुख्य सूत्रधार फरारच
यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील ट्रक चालकाच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या कुख्यात शेख साजीद शेख गफ्फार टोळीवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यासंबंधीचा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात येत असून पुढील आठवड्यात तो मंजुरीसाठी महानिरीक्षकांकडे सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील सिंगलदीप फाट्याजवळ बालसुब्रमण्यम रंगास्वामी (३४) रा.उडकपूर (जि.त्रिपूर, तामिलनाडू) या ट्रक चालकाचा खून करण्यात आला होता. चालकाचा खून करून रूईगाठींसह ट्रक पळवून नेण्याचा या लुटारूंचा मनसुबा होता. मात्र त्याच वेळी पांढरकवडा एसडीपीओ साहेबराव जाधव तेथे पोहोचल्याने त्यांचा ट्रक पळविण्याचा प्रयत्न फसला. परंतु त्यांनी ट्रक चालकाचा खून केला होता. या प्रकरणात पांढरकवडा येथील अट्टल घरफोड्या साजीद टोळीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तो त्या ट्रकच्या स्टेअरिंगवर बसलेला असताना एसडीपीओंच्या पोलीस शिपायाने त्याला ओळखले. मात्र ओळख पटताच तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. तो अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. वडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. ठाणेदार अमोल माळवे यांनी या प्रकरणात आतापर्यंत चोरंबा येथील अनिल जाधव व अन्य एकाला अटक केली. मात्र या घटनेतील म्होरक्या साजीद पोलिसांना हुलकावण्या देत आहे. या प्रकरणात आणखी दोन आरोपी असण्याची शक्यता आहे.
महामार्गावर ट्रकची लुटमार करण्याचा कट रचणाऱ्या व त्यासाठी चालकाचा खूनही करण्यासाठी मागे पुढे न पाहणाऱ्या साजीद टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.
वडकी पोलीस या संबंधीचा प्राथमिक प्रस्ताव तयार करीत आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांच्याकडे सादर केला जाईल. त्यांच्या मंजुरीनंतर सखोल प्रस्ताव तयार करून तपासाअंती अपर महासंचालकांच्या (कायदा व सुव्यवस्था) मंजुरीने दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल.
पुसद येथील व्यापाऱ्याला तीन कोटींच्या खंडणीसाठी खंडाळा घाटात लुटणाऱ्या टोळीवर पोलिसांनी नुकतीच मोक्कांतर्गत कारवाई केली. त्याचे दोषारोपपत्र नुकतेच सादर करण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 'Mokka' on Sajid Touji at Pandharwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.