सोमवार गाजला विविध आंदोलनांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:13 AM2018-04-17T00:13:45+5:302018-04-17T00:14:00+5:30

आठवड्याचा पहिलाच दिवस असलेला सोमवार आंदोलनाचा वार ठरला. तिरंगा चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि बारडवासीयांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.

On Monday, various agitations | सोमवार गाजला विविध आंदोलनांनी

सोमवार गाजला विविध आंदोलनांनी

Next
ठळक मुद्देतिरंगा चौकात धरणे : शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, बारडवासीयांचा जलसमाधीचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आठवड्याचा पहिलाच दिवस असलेला सोमवार आंदोलनाचा वार ठरला. तिरंगा चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि बारडवासीयांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.
सत्तेत येण्यापूर्वी सरकारमधील मंत्र्यांनी एनएचएम कर्मचाºयांना सेवेत नियमित घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजपा सत्तेत येताच त्यांनी आश्वासनाकडे पाठ फिरविली. याविरोधात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने सोमवारी तिरंगा चौकात धरणे आंदोलन केले. सत्ताधाºयांनी एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाºयांचे बिनशर्त नियमित शासन सेवेत समायोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली. समायोजन होईपर्यंत ‘समान काम-समान वेतन’ द्यावे, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करावी, अशी मागणी आहे. आंदोलन काळात कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण न करता त्यांच्यावर कारवाई केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा कर्मचाºयांनी दिला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर कासार, महिला अध्यक्ष आशा कुडचे, शंकर तावडे, किरण शिंदे, विजय सोनोने, हर्षल रणवरे, विकास धुमाळ, प्रशांत जोशी, राकेश नाकाडे, अन्नपूर्णा ढोबळे, अनिल अष्टेकर आदी उपस्थित होते.

२७ फेब्रुवारीच्या बदली आदेशात सुधारणेसाठी शिक्षकांचे धरणे
एकल शिक्षकांवर अन्याय करणारा आणि सर्वात ज्युनियर शिक्षक व शिक्षिकांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण न देणाºया २७ फेब्रुवारीच्या बदली धोरणात सुधारणा करावी, या मागणीसाठी शिक्षकांनीही सोमवारी धरणे दिले. अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीत प्रथम प्राधान्य द्यावे, बदलीसाठी शाळा, तालुक्यातील सेवाज्येष्ठता निश्चित करावी, सरसकट बदल्या न करता बदलीपात्र शिक्षकांपैकी केवळ १० टक्के बदल्या कराव्यात, समुपदेशनाने बदली प्रक्रिया पार पाडावी, नवीन बीएड, डीएडधारकांना संधी देऊन शिक्षकांची रिक्त पदे प्रथम भरावी, यासह विविध मागण्या शिक्षकांनी केल्या. या धरणे आंदोलनात पुंडलिक बुटले, लक्ष्मीप्रसाद वाघमोडे, नीलेश ठाकरे, अरविंद वाईकर, मंगेश फुटाणे, गजानन पोयाम यांच्यासह अनेक शिक्षक सहभागी होते.

Web Title: On Monday, various agitations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.