रविवारी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ; सुपर कोल्ड मूनचा दुर्मिळ योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:42 PM2017-12-02T15:42:14+5:302017-12-02T15:45:03+5:30
आकाशात सातत्याने खगोलीय घटना घडतात. त्यातील क्वचितच आपल्याला अनुभवायला मिळतात. अशीच एक घटना रविवार ३ डिसेंबरला घडणार असून या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असणार आहे.
रूपेश उत्तरवार ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ :
गेल्या ४० वर्षात प्रथमच ३ डिसेंबरला चंद्र आणि पृथ्वी सर्वाधिक जवळ येत आहे. या घटनेला खगोलीय भाषेत ‘सुपर मून’ असे संबोधले जाते. या कालावधीत थंडीची लाट असल्याने यावेळी या घटनेला ‘सुपर कोल्ड मून’, असे संबोधले जाणार आहे. सुपर मूनचा प्रसंग वर्षातून एकदा येतो. मात्र यावेळी गेल्या ४० वर्षांत प्रथमच पृथ्वी आणि चंद्राचे अंतर सर्वाधिक कमी असणार आहे. पृथ्वी आणि चंद्राचे अंतर तीन लाख ६२ हजार किलोमिटरचे आहे. मात्र ३ डिसेंबरला हे अंतर तीन लाख ५७ हजार ४९२ किलोमिटरचे असणार आहे. हे अंतर पाच हजार किलोमिटरने कमी होणार आहे.
पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर कमी होणार असल्याने ३ डिसेंबरला चंद्र नेहमीपेक्षा सात पटींनी मोठा दिसणार आहे. तसेच अंतर कमी झाल्याने चंद्र नेहमीपेक्षा जवळपास १५ पटंनी अधिक तेजस्वीही दिसणार आहे. सर्वसामान्यांना ही खगोलीय घटना ३ आणि ४ डिसेंबरला अवकाशात बघायला मिळणार आहे.
सुपर कोल्ड मून ही दुर्मीळ अखोलीय घटना आहे. खगोल अभ्यासकांसह सामान्य नागरिकांनाही यावेळी चंद्राचे व्यापक आणि तेजस्वी रूप बघता येणार आहे. अभ्यासकांना दुर्बीणीतून काही निरीक्षण नोंदविता येणार आहे.
- सुरेश चोपने
खगोल अभ्यासक