भाजपच्या विरोधात दिग्रस, नेरमध्ये बंजारा बांधवांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 05:00 AM2021-02-17T05:00:00+5:302021-02-17T05:00:07+5:30

मंगळवारी दुपारी १.३० वाजता बंजारा समाजातील महिला-पुरुष वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमल्यानंतर तेथून मोर्चाला प्रारंभ झाला. मानोरा चौक, शिवाजी चौक, जुना पेट्रोल पंप या मार्गाने मोर्चा तहसीलवर पोहोचला. तेथे तहसीलदार राजेश वजिरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात भाजपचे काही नेते चौकशीपूर्वीच संजय राठोड यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान करत आहे.

Morcha of Banjara brothers in Digras, Ner against BJP | भाजपच्या विरोधात दिग्रस, नेरमध्ये बंजारा बांधवांचा मोर्चा

भाजपच्या विरोधात दिग्रस, नेरमध्ये बंजारा बांधवांचा मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देपूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात बदनामी टाळा

 लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस/नेर : पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यूप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांची नाहक बदनामी केली जात आहे. बदनामीचा हा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी करीत मंगळवारी दिग्रस व नेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 
मंगळवारी दुपारी १.३० वाजता बंजारा समाजातील महिला-पुरुष वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमल्यानंतर तेथून मोर्चाला प्रारंभ झाला. मानोरा चौक, शिवाजी चौक, जुना पेट्रोल पंप या मार्गाने मोर्चा तहसीलवर पोहोचला. तेथे तहसीलदार राजेश वजिरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात भाजपचे काही नेते चौकशीपूर्वीच संजय राठोड यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान करत आहे. भाजपच्या या षडयंत्राविरोधात व संजय राठोड यांच्या समर्थनार्थ दिग्रस व नेरमध्ये समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूबद्दल समाज माध्यमात जी उलटसुलट चर्चा होत आहे, ती अत्यंत निंदनीय आहे. तिच्या कुटुंबीयांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार दिलेली नाही. या  प्रकरणातील ऑडिओ क्लिप्सदेखील संशयास्पद आहे. केवळ राजकीय स्वार्थापोटी  या प्रकरणात राठोड यांना बदनाम केले जात असल्याचे निवेदनात नमूद आहे.
संजय राठोड यांच्याविरुद्ध भाजपाने सुरू केलेल्या षडयंत्राची शहानिशा झाल्याशिवाय कोणतीही कार्यवाही होऊ नये. भाजपाकडून राजकीय  षडयंत्र रचून विदर्भातील नेतृत्वाला संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे. याची जातीने चौकशी करावी व संजय राठोडांची बदनामी थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.        
निवेदन देताना दिग्रस व नेरमधील विविध क्षेत्रातील बंजारा समाजातील  महिला, पुरूष तसेच विविध बंजारा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Morcha of Banjara brothers in Digras, Ner against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा