आगामी निवडणुकीत युवकांना मिळणार अधिक संंधी

By admin | Published: July 24, 2016 12:51 AM2016-07-24T00:51:25+5:302016-07-24T00:51:25+5:30

प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी सर्वच स्तरावरील निवडणुका कार्यकर्त्यांच्या विशेष समन्वयातून जिंकण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

More candidates will be available in upcoming elections | आगामी निवडणुकीत युवकांना मिळणार अधिक संंधी

आगामी निवडणुकीत युवकांना मिळणार अधिक संंधी

Next

प्रकाश साबळे : उमरखेडमध्ये काँग्रेसची सभा उत्साहात
उमरखेड : प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी सर्वच स्तरावरील निवडणुका कार्यकर्त्यांच्या विशेष समन्वयातून जिंकण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. यात युवकांना सर्वाधिक संधी देणार असल्याचे पक्ष निरीक्षक प्रकाश साबळे यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक शहर व तालुका, गट आणि गणात पक्ष पोहोचविण्यासाठी पक्ष निरीक्षकांना त्या ठिकाणी जावून प्रत्यक्षदर्शी कार्यकर्ता व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार काँग्रेसने स्थानिक सभा व पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. याच अनुषंगाने बुधवारी स्थानिक नगरपरिषद वाचनालयच्या सभागृहात अमरावती येथील पक्ष निरीक्षक प्रकाश साबळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची समन्वय सभा पार पडली. या सभेला युवकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष निरीक्षक प्रकाश साबळे म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसचे विचार गावागावांत पोहोचविण्यासाठी पक्षातील प्रत्येक तरूण कार्यकर्त्याने निष्ठेने जबाबदारी पार पाडावयाची आहे. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक करून पक्षाची ध्येयधोरणे जनतेला समजावून सांगावयाची आहे. केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात खोटे बोलून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाने शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. सरकार जेवढे अधिक खोटे बोलले, तेवढ्याच प्रमाणात जनता त्यांना आगामी निवडणूक काळात जागा दाखवून देईल, असे मत प्रकाश साबळे यांनी कार्यकर्ता सभेत व्यक्त केले.
यावेळी बोलताना साबळे यांनी आगामी सर्वच निवडणुकांत काँग्रेस पक्ष नवयुवकांना अधिक संधी देणार असल्याचेही स्पष्ट केले. युवा कार्यकर्त्यांनी आता जनतेच्या दारात पोहोचून त्यांना काँग्रेसचे विचार पटवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी पक्षात चैतन्य निर्माण करून जनतेला केंद्र व राज्य शासनाच्या जनताविरोधी धोरणांची माहिती पटवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे होते. मंचावर शहर अध्यक्ष, नगरपरिषद गटनेते नंदकिशोर अग्रवाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तातू देशमुख, युवा नेते राम पाटील देवसरकर, तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती विमल चव्हाण, नगराध्यक्ष उषा आलट, महिला अध्यक्ष सविता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्ष निरीक्षकांनी शे. गणी आणि शे. हमीद कुरेशी (ढाणकी), महंमद सलीम या तिघांची काँग्रेस अल्पसंख्यक आघाडीवर निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांनी कार्यकर्त्यांचेही म्हणणेही आवर्जुन ऐकून घेतले. त्यांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली.
या कार्यकर्ता सभेला बाळासाहेब चंद्रे, छाया धुळध्वज, शिवाजी वानखेडे, ज्योती ठेंगे, वंदना घाडगे, सोनू खतिब, दारासिंग खडे, विविध गावातील सरपंच, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच संस्था पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन नगरपरिषद सभापती शैलेंद्र मुंगे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: More candidates will be available in upcoming elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.