मोझर प्रतिबंधित क्षेत्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:41 AM2021-05-14T04:41:20+5:302021-05-14T04:41:20+5:30
सध्या तालुक्यात ३९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने मोझर, व्याहाळी, आजनी, सिंदखेड, माणिकवाडा, पिंप्री, ...
सध्या तालुक्यात ३९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने मोझर, व्याहाळी, आजनी, सिंदखेड, माणिकवाडा, पिंप्री, मुखत्यारपूर या ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला आहे. मोझर येथे १३ रुग्ण आढळल्याने मोझर, व्याहाळी गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. ही गावे प्रतिबंधित म्हणून घोषित केली आहेत.
गटविकास अधिकाऱ्यांनी या गावाला आवश्यक सेवा पुरवावी, असे आदेशात नमूद आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय साथरोग कायद्यानुसार कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. मोझर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सचिव नीलेश भागवत, तलाठी भारती धांदे यांनी ग्रामस्थांना घरी राहावे, असे आवाहन केले आहे.