उमरखेड येथे आई गौरव पुरस्कार सोहळा
By Admin | Published: March 11, 2017 01:00 AM2017-03-11T01:00:56+5:302017-03-11T01:00:56+5:30
लेकरांना घडविण्यासाठी पालकांनी वेळ देणे गरजेचे आहे. तरच येणारा आपला समाज खऱ्या अर्थाने घडेल
उमरखेड : लेकरांना घडविण्यासाठी पालकांनी वेळ देणे गरजेचे आहे. तरच येणारा आपला समाज खऱ्या अर्थाने घडेल. नाहीतर वृद्धापकाळात लेकरं वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस अॅड.ललिता पाटील यांनी व्यक्त केले.
होम सामाजिक संस्थेच्यावतीने येथील खुल्या नाट्यगृहात आई गौरव पुरस्कार सोहळ्यात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील होत्या. व्यासपीठावर आमदार राजेंद्र नजरधने, नगराध्यक्ष नामदेव ससाने, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, उत्तमराव इंगळे, विजय खडसे, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, डॉ.विजय माने, जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर, चितांगराव कदम, डॉ.इंदूमती खंदारे, सुषमा जाधव, विनोद जैन यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.अविनाश खंदारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेची सामाजिक भूमिका विषद केली. मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. सूर्यकांता पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते २३ कर्तृत्ववान आर्इंचा गौरव करण्यात आला.
यामध्ये केवळाबाई देवसरकर, शोभा देवसरकर, शकुंतला मैंद, प्रतिभा खडसे, अंबूबाई ससाने, पुष्पा चव्हाण, कमल गोरे, सिंधू नरवाडे, प्रभादेवी अग्रवाल, इंदूमती माने, जिजाबाई धबडगे, जिजाबाई साकरकर, निर्मला इटकरे, सुशीला कोकडवार, विमला तेला, वनीता मामीडवार, संगीता राठोड, अलहाज बिस्मील्ला बी. शे. मौला, जमोतीबाई साबळे, द्रोपदा भुते, शांता धात्रक, सुमती डहाळे, कावेरी बिच्चेवार आदींचा समावेश आहे.
सुरुवातीला ‘हंबरून वासरला चाटते जवा गाय’ ही मनाला स्पर्श करणारी कविता मुक्ता ओझलवार यांनी सादर केली. संचालन प्रा.जया खरडेकर व प्रा.देवकांत वंजारे यांनी केले. आभार अरविंद ओझलवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ.वसंत खंदारे, डॉ.विठ्ठल खंदारे, डॉ.ज्ञानेश्वर खंदारे, उषाताई खंदारे आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)