आईने सुपारी देवून केली मुलाची हत्या, चौसाळा जंगलात फेकला मृतदेह; धक्कादायक कारण...

By सुरेंद्र राऊत | Published: April 30, 2023 08:58 PM2023-04-30T20:58:40+5:302023-04-30T20:58:53+5:30

आईसह सहा आरोपींना पोलिसांनी केली अटक.

mother gave contract to kill her son, threw his body in the forest for | आईने सुपारी देवून केली मुलाची हत्या, चौसाळा जंगलात फेकला मृतदेह; धक्कादायक कारण...

आईने सुपारी देवून केली मुलाची हत्या, चौसाळा जंगलात फेकला मृतदेह; धक्कादायक कारण...

googlenewsNext

यवतमाळ : मुलाचे वर्तन सुधारत नाही, त्याच्या पुढे हतबल झाली आहे, अशी आर्जव करीत आईनेच मुलाच्या खुनाची सुपारी दिली. त्यासाठी मुलाचा मावसा, मावशी व मावस भाऊ यांची मदत घेतली. दोघांनी दोन हजार रुपये ॲडव्हॉन्स घेवून मुलाला चौसाळा जंगलात नेले. तेथे गळा आवळला व दगडाने प्रहार केले. २० एप्रिल रोजी घडलेली ही घटना रविवारी उघडकीस आली. लोहारा पोलिसांनी या गुन्ह्यात मृतकाच्या आईसह सहाजणांना अटक केली.

योगेश विजय देशमुख (२५) रा. नेरपिंगळी ता. मोर्शी जि. अमरावती असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याची आई वंदना विजय देशमुख, मावशी उषा मनोहर चौधरी, मावसा मनोहर चौधरी, मावसभाऊ लखन चौधरी तिघे रा. देवीनगर यवतमाळ यांना अटक केली. तर सुपारी घेवून योगेशची हत्या करणारे विक्की भगत व राहुल पठाडे रा. देवीनगर लोहारा यांनाही ताब्यात घेतले आहे.

मुलाचा प्रचंड त्रास आहे, त्याच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे त्या आईने पोलिसांना सांगितले. मुलाला त्याच्या गावावरून यवतमाळात पाठविले. तो मामाकडे काही दिवस राहिला. या दरम्यान आई वंदना हिने बहिण उषा चौधरी हिच्या घरी जावून याेगेशच्या खुनाचा कट रचला. पाच लाख रुपयात खुनाची सुपारी देण्याचे ठरले. त्यापैकी दोन हजार रुपये ॲडव्हॉन्स देण्यात आला. विकी भगत व राहुल पठाडे या दोघांनी योगेशला २० एप्रिल रोजी चौसाळा जंगलात नेवून त्याची हत्या केली. दोघांनी योगेशचा गळा आवळला. नंतर दगडाने त्याच्यावर प्रहार केले.

या प्रकरणी योगेशचे मामा प्रफुल्ल वानखेडे रा. बांगरनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहाजणांविरुद्ध कट रचून हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला. ठाणेदार दीपमाला भेंडे, पोलिस उपनिरीक्षक सारिक फुसे, जमादार श्याम पांढरकर, संतोष आत्राम, जयंत ब्राम्हणकर, दिलीप सावळे, नितीन गजभार यांनी तपास पूर्ण करून आरोपींना अटक केली.

सुपारीच्या पैशातून उघड झाली घटना

हत्येनंतर सुपारी घेणारे विक्की आणि राहूल पाच लाख रुपयांची मागणी करू लागले. पैसे देण्यासाठी योगेशची आई व मावशी यांच्यावर दबाव आणू लागले. प्रतिसाद मिळत नसल्याने २९ एप्रिल रोजी विक्की भगत याने डायल ११२ वर कॉल करुन चौसाळा जंगलात मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले. योगेशचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्याच्या खिशात डॉक्टरची चिठ्ठी सापडली. त्यावर योगेशच्या आईचे नाव व संपर्क क्रमांक नमूद होता. या आधारावरून लोहारा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली व तपास सुरू केला.

Web Title: mother gave contract to kill her son, threw his body in the forest for

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.