‘वसंत’ कारखान्यापुढे समस्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:03 PM2017-09-22T23:03:28+5:302017-09-22T23:03:41+5:30

वसंत सहकारी साखर कारखान्यापुढे समस्यांचा डोंगर उभा असून, या हंगामात साखर कारखाना सुरू होतो की नाही अशी शंका आहे.

The mountain of problems ahead of the 'spring' factory | ‘वसंत’ कारखान्यापुढे समस्यांचा डोंगर

‘वसंत’ कारखान्यापुढे समस्यांचा डोंगर

Next
ठळक मुद्देकामगारांना आशा : साखर आयुक्तांंच्या पत्राने खळबळ

संजय भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : वसंत सहकारी साखर कारखान्यापुढे समस्यांचा डोंगर उभा असून, या हंगामात साखर कारखाना सुरू होतो की नाही अशी शंका आहे. मात्र कामगार आणि कर्मचारी आजही कारखाना सुरू होईल या आशेवर आहे. तर दुसरीकडे साखर आयुक्तांच्या पत्राने संचालक मंडळ घामाघुम झाले आहेत.
वसंत सहकारी साखर कारखाना म्हणजे सत्ताधाºयांसाठी अडकित्त्यातील सुपारी अशी गत झाली आहे. विरोधकांच्या हातून कारखाना भाजपाच्या ताब्यात दिला तरच जिल्हा बँक आर्थिक मदत करेल आणि शासनसुद्धा थकहमी घेईल, असे चित्र निर्माण करण्यात आले. हा कारखाना अलिकडेच भाजपाच्या ताब्यात गेला परंतु अद्यापही कारखाना सुरू होण्याचे चिन्ह दिसत नाही. उसाच्या हमीभावाची ७१ लाखाची रक्कम अद्यापही वसंतने शेतकºयांना दिली नाही. हा प्रकार साखर आयुक्तांच्या लक्षात आला. त्यांनी ही रक्कम जोपर्यंत शेतकºयांना अदा होत नाही आणि २५ टक्के स्वनिधी उभारल्या जात नाही, तोपर्यंत शासनाने कर्ज देण्यासाठी विचार करावा असे कळविले. त्यांच्या या इशाºयामुळे संचालक मंडळ स्वनिधी उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु काही संचालकांनी मालमत्ता गहाण ठेवण्यास नकार दिला आहे.
साखर आयुक्तांच्या निर्देशामुळे संचालक मंडळाला आपली मालमत्ता गाहण खत करून दिल्याशिवाय शासन थकहमी द्यायला तयार नाही की, जिल्हा बँक उभी करायला तयार नाही. त्यामुळे पूर्व हंगामाच्या तयारीत वसंतपुढे समस्यांचा डोंगर उभा झाला आहे. संचालक मंडळाने २५ टक्के निधी उभारतो म्हटले तरी पाच कोटी रुपये उभे होतात. त्यासाठी काहींनी पुढाकार तर काहींनी विरोध दर्शविला. तर वसंतच्या एकूणच कारभाराची माहिती, कारखान्यावर असलेले कर्ज आणि कर्ज वाढण्याची कारणे अशी माहिती शासनाने बोलाविली आहे. त्यामुळे कारखाना कधी सुरू होईल, हे सांगणे कठीण आहे.

Web Title: The mountain of problems ahead of the 'spring' factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.