कापसाच्या पंढरीतच शेतकऱ्यांची वाताहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 10:12 PM2017-12-25T22:12:18+5:302017-12-25T22:12:30+5:30
येथील पवित्र अशा श्री चिंतामणीनगरीत गृत्स्मद ऋषीने कापसाचा शोध लावला. यासंदर्भात पुरणातही नोंद आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे कापूस हे मुख्य पीक होते. परंतु आता कापसाच्या पंढरीतच शेतकऱ्यांची पुरती वाताहात व्हायला सुरुवात झाली आहे.
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : येथील पवित्र अशा श्री चिंतामणीनगरीत गृत्स्मद ऋषीने कापसाचा शोध लावला. यासंदर्भात पुरणातही नोंद आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे कापूस हे मुख्य पीक होते. परंतु आता कापसाच्या पंढरीतच शेतकऱ्यांची पुरती वाताहात व्हायला सुरुवात झाली आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांचे कापूस हे मुख्य पीक आहे़ पांढऱ्या सोन्याची पंढरी म्हणूनही विदर्भाकडे पाहिले जाते़ नगदी उत्पन्न देणारे पीक म्हणूनही कापसाच्या पिकाची ओळख आहे़ परंतु मागील काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता कापूस हे अनिश्चितेचे पीक झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहे़ काही वर्षापूर्वी कापसाला सात हजारापर्यंत भाव मिळाला होता़ परंतु नजीकच्या काळात कापसाचे भाव कमालीचे कोसळले़ बोंडअळी व इतर रोगांनी कपाशीची वाट लागली. संपूर्ण पीक अळीने फस्त केले. शेतकरी दशोधडीला लागला. या सर्व प्रकाराला शासनाचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप शेतकºयांतून होत आहे़ पीक उत्पन्नासाठी लागणरे पैसेही निघत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़
यापूर्वी कापसाचा भाव सात हजारापर्यंत गेला होता़ त्यामुळे त्याच्या आसपास भाव मिळतील या एकमेव आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करतात. परंतु दरवर्षी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. यावर्षी सुरुवातीला तर साडेतीन ते चार हजारापर्यंतच शेतकऱ्यांना कापूस विकाला लागला. किती दिवस कापूस घरामध्ये ठेऊन जपायचा, याच विचारात शेतकरी वर्ग दिसू येतो़ शेतकऱ्यांजवळचा कापूस संपल्यानंतर भाववाढ होते. याला कुठे तरी आळा घालणे गरजेचे आहे.
शेतीपयोगी साहित्याच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे़ औषध-बियाण्यांच्याही किंमती आकाशाला भिडल्या आहे़ परंतु कापसाचा भाव पाहिला तर उत्पादनासाठी लागलेला खर्चही निघत नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले जीवनाचे रहाटगाडगे कसे चालवावे, अशा प्रश्न निर्माण झाला आहे़
बाजारपेठेतही कापसाला भावाचा डंख
आधीच यावर्षी कापसाला समाधानकारक भाव मिळाला नाही़ त्यातल्या त्यात शासनाच्या धोरणामुळे भाव वर-खाली होत असतात़ त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना नुकसान तर व्यापाºयांचा मात्र फायदा होतो, अशी अनेक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे.